पुण्यातील मुळशी तालुक्यातील १६ मे रोजी वैष्णवी हागवणे यांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी तिचे सासरे राजेंद्र हागवणे आणि दीर सुशील हागवणे यांना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले होते. पण ती हत्या आहे असा आरोपही झालेला आहे. त्यासंदर्भात वैष्णवी यांची सासू, नणंद, पती शशांक यांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. पण सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हागवणे तसेच दीर सुशील हे फरार होते. पहाटे त्यांना अटक करण्यात आली. स्वारगेट परिसरात त्यांना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या होत्या. वैष्णवी हिच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यातूनच तिची हत्या केल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक केली होती. आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार होते.
राजेंद्र हगवणे हे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी ते दिसले. पिंपरी चिंचवड पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. परंतु या घटनेची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी दिली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
सशस्त्र दलाच्या जवानांनी अंडरट्रायल कैद्याला सोडले मोकाट, मनसे उपाध्यक्षाला धमकी
संयुक्त अरब अमिराती दहशतवादाविरोधात भारतासोबत
मलेशिया मास्टर्स: श्रीकांत, तनिषा-ध्रुव उपांत्यपूर्व फेरीत दाखल
हागवणे कुटूंबाने वैष्णवीचा अनन्वित छळ केल्याचे आढळले होते. खरे तर वैष्णवीच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी लग्नात भरपूर खर्च केला होता. ५१ तोळे सोने, जावयाला फॉर्च्युनर गाडी, त्याला दीड लाखाचा मोबाईल, सोन्याची अंगठी असे सगळे देण्यात आले होते. पण हागवणे कुटूंबाची हाव काही संपत नव्हती.
वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
