26 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरविशेषसंयुक्त अरब अमिराती दहशतवादाविरोधात भारतासोबत

संयुक्त अरब अमिराती दहशतवादाविरोधात भारतासोबत

सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे श्रीकांत शिंदे यांनी दिले तपशील

Google News Follow

Related

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, सर्वपक्षीय खासदार दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे सत्य आणि भारताची दहशतवाद विरोधातील लढाई याची माहिती जगाला सांगण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या देशांचे दौरे करत आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी खासदारांनी युएई फेडरल नॅशनल कौन्सिलच्या संरक्षण व्यवहार, अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुआमी यांचीही भेट घेतली.

सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी एएनआयशी बोलताना सांगितले की, युएईने कोणत्याही प्रकारे दहशतवादाला पाठिंबा देणार नाही याची पुष्टी केली आहे. पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेल्याचे या बैठकीत सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून भारत अशा हल्ल्यांचा बळी ठरत असून मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोट हल्ला, पुलवामा हल्ला याची माहिती त्यांना होती. त्यांनी असा स्पष्ट संदेश दिला आहे की ते कधीही अशा दहशतवादी संघटना किंवा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत उभे राहू शकत नाहीत. ते दहशतवादाविरुद्ध आहेत आणि सर्व देशांनी एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढणे महत्त्वाचे आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, युएई भारतासोबत उभा आहे आणि संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी आणि सहिष्णुता मंत्री नाहयान यांच्याशी झालेल्या शिष्टमंडळाच्या भेटीतही ते निश्चित करण्यात आले. पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले की, “आमची युएईच्या समकक्षांसोबतची बैठक फलदायी झाली. आम्ही संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी यांना भेटलो. आम्ही सहिष्णुता मंत्री शेख नाहयान यांच्याशीही बोललो. युएई दहशतवादाविरुद्ध भारतासोबत पूर्ण वचनबद्धतेने खांद्याला खांदा लावून उभा आहे. युएईने दिलेला स्पष्ट संदेश होता की आम्ही भारतासोबत दहशतवादाविरुद्ध उभे आहोत, दहशतवादाविरुद्ध लढत आहोत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा..

जेव्हा सिंदूर दारुगोळा बनतो, तेव्हा काय होते ते शत्रूने पाहिले!

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पीरपैंती रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले !

भारताप्रमाणेच युएईमध्ये वैविध्य आहे आणि हे पाहता, युएईकडून मिळणारा पाठिंबा खूप महत्त्वाचा असल्याचे शिंदे म्हणाले. भारताप्रमाणेच युएई आपल्या अल्पसंख्याकांना पाठिंबा देतो, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच, त्यांचा भारताला मिळणारा पाठिंबा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या आणि ज्या पद्धतीने येथे प्रगती होत आहे, त्यामुळे वाटते की या राष्ट्राने कठीण काळात, कसोटीच्या काळात भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा