28.2 C
Mumbai
Saturday, July 25, 2026
घरबिजनेसAI मुळे टेक क्षेत्रात नोकऱ्यांवर घाला

AI मुळे टेक क्षेत्रात नोकऱ्यांवर घाला

भारतात ३५ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

Google News Follow

Related

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे जागतिक आयटी उद्योगात मोठे बदल घडत आहेत. कंपन्या अधिक कार्यक्षम, वेगवान आणि कमी खर्चिक कामकाजासाठी AI वर मोठ्या प्रमाणात भर देत असल्याने पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम दिसू लागला आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत जगभरातील टेक कंपन्यांनी १.२ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली असून, भारतातही वर्षअखेरपर्यंत २५ ते ३५ हजार टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

AI आधारित ऑटोमेशनमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्वालिटी अॅश्युरन्स (QA), टेक सपोर्ट, बॅक-ऑफिस ऑपरेशन्स आणि नियमित स्वरूपाच्या कोडिंगशी संबंधित अनेक कामांची गरज कमी होत आहे. त्यामुळे अनेक आयटी कंपन्या थेट कर्मचारी कपात, नव्या भरतीवर निर्बंध आणि अंतर्गत पुनर्रचनेचा मार्ग स्वीकारत आहेत. भारतातही ‘सायलेंट लेऑफ’चे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.

Amazon, Microsoft, Meta, Intel आणि Oracle यांसारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्या AI आणि डेटा सेंटर्सवर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असताना हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, AI मुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होत असल्या तरी AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्ये नव्या रोजगाराच्या संधीही वेगाने निर्माण होत आहेत. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सातत्याने नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे आणि स्वतःला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा