छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सोने आणि परकीय चलनाच्या तस्करीचा प्रयत्न उघडकीस आणला आहे. या तस्करी प्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे ९८ लाख रुपयांचे सोने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ड्रग्ज, सोने आणि परकीय चलनाच्या तस्करीत वाढ झाली असून कस्टम विभागाकडून यासाठी विशेष मोहिमे राबविण्यात येते आहे. विशेष मोहिमेअंतर्गत कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावरील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सुरू केली आहे.
हे ही वाचा :
उत्तर कोरियाचे युद्धनौका प्रक्षेपण अपयशी
देशाचे गद्दार म्हणून हे आहेत हाफीज सईदचे यार…
उत्तर कोरियाचे युद्धनौका प्रक्षेपण अपयशी
दरम्यान या मोहिमेचा भाग म्हणून मंगळवारी, बहरीन आणि दमण येथून येणारे दोन प्रवासी त्यांच्या हालचाली वरून संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यांच्या सामानाच्या ट्रॉलीची चौकशी आणि तपासणी केल्यानंतर, अधिकाऱ्यांना जाहिरातीच्या स्टिकर्सखाली लपलेले सोने आढळले. पथकाने २४७ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचे बार जप्त केले, ज्याची किंमत सुमारे २२ लाख रुपये आहे.
त्याच दिवशी एका वेगळ्या पण संबंधित घटनेत, मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या आणखी एका प्रवाशाला चौकशीसाठी थांबवण्यात आले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता, अधिकाऱ्यांनी ९०,००० अमेरिकन डॉलर्स, भारतीय चलनात त्यांची किमत ७६.२३ लाख रुपयांच्या समतुल्य आहेत, जप्त केले आहे.
दोन्ही कारवाईनंतर, तिन्ही प्रवाशांना सोने आणि परकीय चलन तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अधिकारी आता तपास करत आहेत की आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे का आणि तस्करी केलेल्या वस्तूंचा स्रोत ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.
