‘RAW’-‘ISI’ एकत्र आल्यास भारत-पाकमध्ये दहशतवाद कमी दिसेल!

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टोंची विनवणी

‘RAW’-‘ISI’ एकत्र आल्यास भारत-पाकमध्ये दहशतवाद कमी दिसेल!

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झालेल्या पराभवानंतर, पाकिस्तान आता भारताशी चर्चा करू इच्छित आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये म्हणजेच आयएसआय आणि रॉ यांच्यात संवाद साधण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही आपले शिष्टमंडळ अमेरिकेत पाठवले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ब्रीफिंगला उपस्थित राहिलेल्या भुट्टो यांनी भारतासोबत सलोख्याबद्दल बोलले आहे. भुट्टो म्हणाले, ‘पाकिस्तान अजूनही दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला सहकार्य करू इच्छितो. आपण अब्जावधी लोकांचे भविष्य  दहशतवाद्यांच्या हातात सोडू शकत नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘मला पूर्ण विश्वास आहे की जर आयएसआय आणि रॉ एकत्र बसून या शक्तींविरुद्ध लढण्यास तयार असतील तर आपल्याला भारत आणि पाकिस्तान दोन्हीमध्ये दहशतवाद कमी झालेला दिसेल.’ दरम्यान, भुट्टो यांच्या वक्तव्यावरून ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला बसलेला फटका आणि शांततेसाठी त्यांची सुरु असलेली धडपड दिसून येते.

हे ही वाचा : 

१० लाख सबस्क्राइबर्स, ज्योती मल्होत्राशी लिंक; हेरगिरी प्रकरणी आणखी एका युट्यूबरला अटक!

भारताविरोधात ISI चा नवा तळ म्हणजे बांगलादेश

सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते..

१८ वर्षांची प्रतीक्षा संपली… विराट कोहलीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! आरसीबी आयपीएल चॅम्पियन!

दरम्यान, अझरबैजानमधील लाचिन येथे झालेल्या पाकिस्तान-तुर्की-अझरबैजान त्रिपक्षीय शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती आणि सांगितले की काश्मीर, पाणी आणि दहशतवादासह सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भारताशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. तेहरान दौऱ्यादरम्यान देखील त्यांनी सर्व वाद सोडवण्यासाठी भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

Exit mobile version