चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला दिली. त्यात पाकिस्तान आणि काँग्रेसला अपेक्षित असलेला प्रश्न विचारला, ‘किती राफेल पाडली? यावर सीडीएस चौहान यांनी जे उत्तर दिले त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या काड्यांना पुन्हा जोर आलेला आहे. सीडीएस जे बोलले तो गौप्यस्फोट वगैरे अजिबात नव्हता एअर मार्शल ए.के.भारती यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना यावर प्रकाश टाकला होता. नुकसान हा युद्धाचा अविभाज्य घटक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सीडीएस यांनी तेच सांगितले, त्याचाही विपर्यास करण्यात आला.
