जय हिंद…भारत माता की जय..च्या घोषणांनी सोशल मीडिया गुंजला

जय हिंद…भारत माता की जय..च्या घोषणांनी सोशल मीडिया गुंजला

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता सोशल मीडियावर जय हिंद, भारत माता की जय च्या घोषणांचा पाऊस पडू लागला आहे.

भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची केंद्र असलेल्या ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूर या नावाने ही कारवाई सुरू झाली असून त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी भारत माता की जय म्हणत या कारवाईची पुष्टी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून असे काहीतरी होणार हे माहीत होते. पण हा वाद लवकर संपुष्टात यावा, असे म्हटले आहे. दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत रुबीओ यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जय हिंद, भारत माता की जय म्हणत ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर शेअर केले आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जय हिंद…जय हिंद की सेना असे म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वशर्मा यांनीही भारत माता की जय म्हणत भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. पियुष गोयल यांनीही जय हिंद असे म्हणत या कारवाईचे स्वागत केले आहे.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या हल्ल्याची कबुली दिली असून लाहोर तसेच सियालकोट येथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

पुण्यश्लोक अहिल्यादेविंच्या जीवनावर राज्य सरकारकडून चित्रपट निर्मिती

पुण्यश्लोक अहिल्यादेविंच्या जीवनावर राज्य सरकारकडून चित्रपट निर्मिती

पाकिस्तानला आठवले मिया चन्नू…

मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी १३ जंणावर गुन्हा दाखल

पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर त्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून वैयक्तिक अशी मोठी प्रतिक्रिया आली नव्हती, पण आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत भारतीय लष्कराला सॅल्युट केला आहे. दहशतवाद्यांची सर्व केंद्र उद्ध्वस्त व्हायला हवीत असे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version