‘लावा मोबाईल्स’ने ११ जून रोजी, आपल्या चॅनेल पार्टनर्ससाठी (भागीदार) आयोजित केलेल्या परदेश दौऱ्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ एका गटाला घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात जीव गमावलेल्या १५ जणांपैकी १४ जण चॅनेल पार्टनर्स होते, तर एक जण कंपनीच्या टीमचा सदस्य होता. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण भारतातील ‘लावा मोबाईल्स’चे ११० वितरक आणि कर्मचारी या दौऱ्यावर होते. मृतांपैकी १० जण तामिळनाडूचे, तीन आंध्र प्रदेशचे आणि दोन केरळचे आहेत.
We at Lava are deeply saddened to confirm that 14 of our channel partners and one member of our Lava team have tragically lost their lives in a boat accident earlier today near Phu Quoc Island, Vietnam.
Our hearts and prayers are with their families and loved ones. This is an…
— Lava Mobiles (@LavaMobile) July 11, 2026
कंपनीचे स्पष्टीकरण
‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ‘लावा मोबाईल्स’ने म्हटले आहे की, “व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ आज झालेल्या बोट अपघातात आमचे १४ चॅनेल पार्टनर्स आणि ‘लावा’ टीमचा एक सदस्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे सांगताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे.” कंपनीने पुढे म्हटले, “आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत. ही एक अकल्पनीय शोकांतिका आहे आणि या अत्यंत कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.” मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी व्हिएतनाममधील भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनासोबत मिळून काम करत असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीने म्हटले, “बाधित प्रत्येक कुटुंबाला आधार देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि भारत व व्हिएतनाममधील आमची पथके त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने काम करत आहेत.”
I am devastated by this tragic incident in Vietnam.
My heart goes out to everyone affected and to the families who are enduring this unimaginable loss. They are in my thoughts and prayers.
We are working closely with the Embassy of India in Vietnam, the local authorities, and our… https://t.co/8FjamtDOuJ— Sunil Raina (@reachraina) July 11, 2026
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) सुनील रैना यांनी कंपनीची पोस्ट शेअर करत म्हटले, “व्हिएतनाममधील या दुर्दैवी घटनेमुळे मला मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा फटका बसलेल्या प्रत्येकाबद्दल आणि या अकल्पनीय हानीला सामोरे जाणाऱ्या कुटुंबांबद्दल माझ्या मनात तीव्र संवेदना आहेत. ते माझ्या विचारांत आणि प्रार्थनेत आहेत.” बाधित व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी दूतावास आणि स्थानिक प्रशासनासोबत मिळून काम करत असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
अपघात कसा घडला?
बोटमधील प्रवासी असलेल्या आणि सुखरूप वाचलेल्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या स्पीडबोटमध्ये एकूण ३२ प्रवासी होते. एनडीटीव्हीशी बोलताना त्याने सांगितले, “ती एक बंदिस्त (कव्हर्ड) बोट होती आणि सर्व ३२ जण आत होते. बोट सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांतच एका जोरदार वादळाचा तडाखा बसल्याने ती उलटली.” त्यांनी सांगितले की, पुढील भागात असलेले २० प्रवासी खिडकीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर मागील भागात असलेले १५ जण आतच अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान मोदींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आणि म्हटले, “व्हिएतनाममधील फु क्वोक (Phu Quoc) जवळ भारतीय नागरिकांचा समावेश असलेल्या बोट अपघाताची दुःखद बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले आहे.” “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या कुटुंबांप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो. आमचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. आमचे अधिकारी व्हिएतनामी अधिकाऱ्यांच्याही सतत संपर्कात आहेत.”
व्हिएतनाममध्ये काय घडले?
११ जुलै रोजी, पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट लोकप्रिय ‘फु क्वोक’ बेटाजवळ उलटली, ज्यामुळे बचावकार्य सुरू करण्यात आले आणि त्या देशातील भारतीय दूतावासाने तातडीने पावले उचलली. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने पुष्टी केली की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. दूतावासाने ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एका दुःखद घटनेत, काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. स्थानिक अधिकाऱ्यांकडून शोध आणि बचावकार्य सुरू असल्याने या घटनेचा नेमका तपशील मिळवला जात आहे.”
हे ही वाचा:
सूरांचा अमर स्वर हरपला; दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन
वाळवंटातला मैलाचा दगड; तेल शुद्ध तुझं, गोष्ट आहे पचपद्राची
अल निनोमुळे राज्यात पुन्हा पावसाची प्रतीक्षा
नेपाळ दौऱ्यावर इंडिया ‘ए’; BCCI ने जाहीर केले वेळापत्रक
भारतातील कुटुंबांमध्ये चिंता वाढल्यामुळे, भारतीय दूतावासाने नातेवाईकांना मदत करण्यासाठी हो ची मिन्ह सिटी आणि हनोई या दोन्ही ठिकाणी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची घोषणा केली.
