जम्मूच्या विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद विरोधात पहलगाम प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, निष्पक्ष चौकशीसाठी हाफिज सईदला ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने ८ जुलै रोजी आदेश केला होता, ही माहिती मंगळवारी समोर आली आहे. यापूर्वी 6 जुलै रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पहलगाम हल्ल्यासंदर्भात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.
एजन्सीने म्हटले होते की, बैसरनघाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट हाफिज सईदनेच रचला होता. NIA ने हाफिजवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांची हत्या केली होती. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले होते. यानंतर भारताने 6-7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील 9 ठिकाणांवर हल्ला केला होता. भारताचा दावा आहे की, यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवादी मारले गेले
पहलगाम हल्ल्यानंतर NIA ने 15 डिसेंबर 2025 रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात पाकिस्तानचा दहशतवादी हँडलर साजिद जटसह 6 दहशतवाद्यांना आरोपी बनवले होते. त्यावेळी हाफिज सईदचे नाव समोर आले नव्हते. पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा हँडलर सैफुल्लाह जट्ट उर्फ लंगडा अजूनही जिवंत आहे. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस आहे.
हे ही वाचा:
एचडीएफसी इर्गोच्या नावाने ग्राहकांना गंडवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
लंडनमध्ये मंदिराची जमीन विकली मशिदीला
चेंबूर दुर्घटना: BMCला क्लीन चिट, कंत्राटदारांना ७ लाखांचा दंड
दहशतवाद्यांचे मोबाईल कराची-लाहोरमधून
हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांचा २८ जुलै रोजी एन्काउंटर झाला. त्यांच्याकडून दोन मोबाईल (नारंगी रंगाचा RedMi 9T आणि एक काळ्या रंगाचा RedMi Note 12) मिळाले. यामध्ये बैसरन घाटाचे लोकेशन आणि स्क्रीनशॉट मिळाले. हे मोबाईल कराचीच्या सप्लाय चेनमार्फत पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. हल्ल्यात वापरलेला ॲक्शन कॅमेरा अमेरिकेत बनवला होता आणि चीनमार्गे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचला. याचा वापर बाइकिंग, ट्रेकिंग, डायव्हिंग आणि प्रवासात व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी होतो.
