28.4 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026
घरक्राईमनामाआमदार असल्याचे सांगून लुटणारा पंजाबचा भामटा बोरिवलीत जेरबंद

आमदार असल्याचे सांगून लुटणारा पंजाबचा भामटा बोरिवलीत जेरबंद

पोलिसांकडून लखनऊमध्ये बेड्या

Google News Follow

Related

आमदार संजय उपाध्याय यांचा वैयक्तिक सहाय्यक (PA) असल्याचे भासवून आणि कधीकधी खुद्द आमदारच बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका ४४ वर्षीय भामट्याला बोरिवली पोलिसांनी लखनऊमधून अटक केली आहे. भलींद्र पाल बलदेव सिंग सहगल (रा. मोहाली, पंजाब) असे या तोतयाचे नाव आहे.

तक्रारदार तुषार गिरीश मडीवेडिया (४६) आणि त्यांचे मित्र भरत रतिलाल शाह यांना आरोपीने फोन केला होता. आपण आमदार संजय उपाध्याय यांचा पीए बोलत असल्याचे सांगून त्याने एका विद्यार्थिनीच्या लखनऊ विद्यापीठातील फी भरण्यासाठी मदतीचे आवाहन केले. ही बतावणी खरी मानून तक्रारदाराने १९० रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर, लखनौमध्ये हॉटेल बुक करण्याच्या बहाण्याने आरोपीने तक्रारदाराच्या मित्राला ८ हजार रुपये डिजिटल वॉलेटद्वारे पाठवायला लावले. अशा प्रकारे एकूण ८ हजार १९० रुपयांची फसवणूक करण्यात आली.
हे ही वाचा:
कल्याण शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स मुथाच्या मुलाने उडवले दुचाकीला

क्लान राइस सेमीफायनलमध्ये खेळणार?

दोन दशकांनंतर इंग्लंड-अर्जेंटिना आमनेसामने

मणिपूरमध्ये शस्त्रसाठ्यासह उग्रवाद्याला अटक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. या तपासात आरोपीचे लोकेशन लखनौमध्ये आढळले. बोरिवली पोलिसांच्या पथकाने तातडीने लखनऊ गाठून आरोपी सहगलला जेरबंद केले. आरोपीने अशाच प्रकारे लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे भासवून अनेक नागरिकांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीला मुंबईत आणले असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा