26 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरविशेषराजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

८ जण गंभीर जखमी

Google News Follow

राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. कोटा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. मृत आणि जखमी भाविक हे महाराष्ट्रातील धुळे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. खाटू श्यामजी मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांवर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या घटनेमुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील तीन कुटुंबांतील सदस्य स्वतंत्र वाहनांमधून राजस्थानमधील खाटू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते परतीचा प्रवास करत होते. यावेळी भाविक प्रवास करत असलेल्या क्रूझर वाहनाची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य ८ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
हे ही वाचा:
सामरिक तेलसाठा खोल खोल, चंडीखोल

गंभीर आहे…छाबड हाऊसच्या रेकीचे प्रकरण

राहुल गांधींना झालंय काय?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४ हजार कोटींच्या ‘नितीश सेतू’चे लोकार्पण

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कोटा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले असून, त्यांच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, वाहनचालकाला प्रवासादरम्यान डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजस्थान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका धार्मिक यात्रेसाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांचा प्रवास अशा दुर्दैवी घटनेने संपल्याने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांची सतर्कता आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा