26 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरविशेषपुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा

पुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा

झुरळांचा प्रादुर्भाव,अस्वच्छता आणि नियमभंगामुळे परवाने निलंबित

Google News Follow

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्यसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि लोणावळ्यातील हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांची साठवणूक करणाऱ्या डार्क स्टोअरवर मोठी कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ स्वयंपाकघर, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि बुरशी लागलेले पदार्थ अशा गंभीर त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकूण १४ हॉटेल्स आणि दोन डार्क स्टोअरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही विशेष तपासणी करण्यात आली.

पुण्यातील कॅम्प आणि महात्मा गांधी रस्ता परिसरातील २० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ आस्थापनांमध्ये गंभीर अनियमितता आढळली. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव, कृत्रिम खाद्यरंगांचा वापर आणि अजिनोमोटोचा अतिरिक्त वापर अशा बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे संबंधित आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. अन्नपदार्थ तयार करताना आणि साठवताना आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचेही या तपासणीतून स्पष्ट झाले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

सामरिक तेलसाठा खोल खोल, चंडीखोल

गंभीर आहे…छाबड हाऊसच्या रेकीचे प्रकरण

दरम्यान, लोणावळ्यातील द ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या हॉटेल्समध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. काही ठिकाणी मुदतबाह्य दूध, चीज आणि ब्रेडचा साठा आढळला. एका हॉटेलमध्ये कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले, तर दुसरीकडे बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्यरंग वापरले जात होते. स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या अयोग्य साठवणुकीमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय सिंहगड रस्ता परिसरातील दोन डार्क स्टोअरची तपासणी केली असता मुदतबाह्य लाडू, पेढे, केक, पाव आणि बुरशी लागलेले खाद्यपदार्थ आढळले. काही पदार्थ जमिनीवर ठेवण्यात आले होते, तर तूप आणि साबणाची एकत्रित साठवणूक केली जात होती. या दोन्ही डार्क स्टोअरचे परवानेही निलंबित करण्यात आले. सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्री आणि साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा