29.4 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरस्पोर्ट्सक्लान राइस सेमीफायनलमध्ये खेळणार?

क्लान राइस सेमीफायनलमध्ये खेळणार?

Google News Follow

इंग्लंडचा स्टार मिडफिल्डर आणि उपकर्णधार डेक्लान राइस आजारातून बरा झाला असला, तरी अर्जेंटिनाविरुद्धच्या फिफा विश्वचषक २०२६ उपांत्य फेरीत तो खेळणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सामन्याच्या अगदी आधी घेतला जाणार आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक थॉमस ट्यूशेल राइसच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अखेरच्या सराव सत्रानंतरच त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेणार आहेत.

नॉर्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी राइस आजारी पडला होता. वृत्तानुसार, सामन्यापूर्वी तीन दिवस तो अंथरुणावर होता. असे असतानाही त्याने सामन्याची सुरुवात केली. मात्र, पहिल्या हाफमध्ये तो अस्वस्थ दिसला आणि मध्यंतरानंतर त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आले. आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली असून, सोमवारी त्याने संघासोबत नियमित सरावही केला.

आजारपणासोबतच राइसला हॅमस्ट्रिंग आणि पाठदुखीच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. तरीही २७ वर्षीय मिडफिल्डरला अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी आपण पूर्णपणे तयार होऊ, असा विश्वास आहे. इंग्लंडकडून ७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला राइस या विश्वचषकातील जवळपास सर्व सामन्यांत सुरुवातीच्या संघाचा भाग राहिला आहे. केवळ पनामाविरुद्धचा साखळी फेरीतील सामना त्याला दुखापतीमुळे खेळता आला नव्हता.

उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंडचा संघ कॅन्सस सिटीतील प्रशिक्षण केंद्रात अखेरचे सराव सत्र करणार आहे. त्यानंतर खेळाडूंचे रिकव्हरी सेशन होईल आणि संपूर्ण संघ अटलांटासाठी रवाना होईल. याच ठिकाणी उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. ट्यूशेल तीन खेळाडूंसह सामन्यापूर्वी स्टेडियमची पाहणीही करणार आहेत.

इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठण्यासाठी जोरदार संघर्ष केला आहे. इंग्लंडने बाद फेरीत काँगो डीआर, मेक्सिको आणि नॉर्वे यांना पराभूत करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाने काबो व्हर्डे, इजिप्त आणि स्वित्झर्लंड या संघांना नमवत आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे.

इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२.३० वाजता खेळवला जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा