पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची बोलती बंद

पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला

भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करून टाकले. यानंतर पाकिस्तानकडून स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी म्हणून सोशल मीडियावर अनेक निरर्थक दावे करण्यात आले. जुने फोटो, व्हिडीओ वापरून भारताला प्रत्युत्तर दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, पाकिस्तानच्या चुकीची माहिती पसरवणाऱ्या मोहिमेचा पर्दाफाश झाला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची पुन्हा एकदा लाज निघाली आहे.

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे उत्तर देताना तोंडावर आपटले असून पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आले नसल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सैन्याने भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याच्या दावा करण्यात येत होता. मुलाखती दरम्यान, पाच भारतीय लढाऊ विमाने पाडल्याच्या दाव्याचे पुरावे मागितले असता ख्वाजा यांनी उत्तर दिले की, हे सर्व सोशल मीडियावर आहे, भारतातील सोशल मीडियावर आहे, आमच्या सोशल मीडियावर नाही. या विमानांचे अवशेष काश्मीरमध्ये पडले. आणि आज ते संपूर्ण भारतीय माध्यमांवर आहे आणि त्यांनी ते मान्य केले आहे.

ख्वाजा यांच्या या सोशल मीडियावरील पुराव्यांवरून पत्रकाराने त्यांचा ढोंगीपणा उघड केला. पत्रकाराने म्हटले की, मला माफ करा आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील सामग्रीबद्दल बोलण्यास सांगितले नाही. यामुळे संरक्षण मंत्र्यांना मान खाली घालावी लागली. तसेच लढाऊ विमाने कशी पाडली गेली आणि कोणती उपकरणे वापरली गेली याबद्दल अधिक विचारले असता, ख्वाजा आसिफ काहीही बोलू शकले नाहीत. पाकिस्तानने भारताचे विमान पाडण्यासाठी चिनी उपकरणांचा वापर केला का याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “नाही, चिनी उपकरणे. आमच्याकडे चिनी विमाने आहेत, JF-17 आणि JF-10. ती चिनी विमाने आहेत, पण ती आता पाकिस्तानमध्ये तयार केली जात आहेत. जर भारत फ्रान्सकडून विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो, तर आम्ही चीन किंवा रशिया किंवा अमेरिका, ब्रिटनकडूनही विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो.”

हे ही वाचा..

राज ठाकरे काय बोलतात याला काही महत्व नाही!

भारताने करतारपूर कॉरिडोर केला बंद

विवेक ओबेरॉय म्हणतो, अश्रूंचा बदला घेतला

पिक्चर अभी बाकी है!

यापूर्वीही ख्वाजा आसिफ यांनी एका व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये पाकिस्तान दहशतवादी गटांना निधी आणि पाठबळ देत असल्याचे सांगून मोठी कबुली दिली होती. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला होता. याशिवाय इतर काही नेत्यांनीही दहशतवाद पोसण्याच्या माहितीला दुजोरा दिला होता.

Exit mobile version