स्टारलिंकने १० हजार उपग्रह केले प्रक्षेपित

एलन मस्क यांनी टीमचे केले कौतुक

स्टारलिंकने १० हजार उपग्रह केले प्रक्षेपित

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी सोमवारी आपल्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकचे कौतुक करताना सांगितले की कंपनीने आतापर्यंत १० हजार उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी कॅलिफोर्नियातील व्हॅनडनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून २८ स्टारलिंक इंटरनेट उपग्रह घेऊन जाणाऱ्या फाल्कन ९ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर झाली. या प्रक्षेपणासह स्टारलिंकने १९ ऑक्टोबर रोजी १० हजार उपग्रहांचा टप्पा पार केला.

या मोहिमेद्वारे स्पेसएक्सची २०२५ मधील ही १३२ वी फाल्कन ९ उड्डाण ठरली असून, याने मागील वर्षाचा विक्रम गाठला आहे. विशेष म्हणजे अजून दोन महिन्यांहून अधिक वेळ शिल्लक असल्याने हा विक्रम ओलांडण्याची दाट शक्यता आहे. एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, “स्टारलिंक आणि फाल्कन टीमचे अभिनंदन! १० हजार उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. स्पेसएक्सकडे आता पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सर्व उपग्रहांच्या तुलनेत अनेक पट अधिक उपग्रह आहेत.”

हेही वाचा..

“राहुलजी, लवकर लग्न करा, लग्नाची ऑर्डर हवी आहे”

मोदी हटाओ बारगळले, ट्रम्प हटाओ जोरात अमेरिकेत GEN – Z  रस्त्यावर

म्यानमारमधून तस्करी केलेली बियाणे, सुपारीची १ कोटींची खेप जप्त

५४ वर्षांत पहिल्यांदाच मथुरेच्या बांके बिहारी मंदिरातील तोषखाना उघडला; काय काय आढळले?

स्टारलिंकनेही X वर पोस्ट करून सांगितले की, “स्पेसएक्सने आतापर्यंत १० हजार पेक्षा जास्त स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले असून, त्याद्वारे जगभरातील लाखो लोकांना विश्वसनीय आणि उच्चगती इंटरनेट सेवा मिळत आहे.” स्टारलिंक नेटवर्कची सुरुवात २०१८ मध्ये ‘टिनटिन ए’ आणि ‘टिनटिन बी’ या दोन प्रोटोटाइप उपग्रहांपासून झाली होती. सध्या स्टारलिंकचे ८ हजार हून अधिक उपग्रह कार्यरत आहेत आणि ते जगभरातील लाखो वापरकर्त्यांना सेवा देत आहेत.

स्पेसएक्सद्वारे चालविले जाणारे हे नेटवर्क लो अर्थ ऑर्बिट (LEO) मधील उपग्रहांद्वारे इंटरनेट पुरवते. विशेषतः दुर्गम भागात आणि संघर्षग्रस्त प्रदेशांत या सेवेमुळे संवाद शक्य झाला आहे. स्टारलिंकला एकूण १२ हजार उपग्रह तैनात करण्याची परवानगी मिळाली असून, भविष्यात हा आकडा ३० हजार पेक्षा अधिक नेण्याची योजना आहे. सध्या ही सेवा १५० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे आणि भारतामध्येही वापरास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, स्पेसएक्सने १३ ऑक्टोबर रोजी आपल्या स्टारशिप रॉकेटची ११ वी चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केली. हे रॉकेट टेक्सासमधील स्टारबेसवरून उड्डाण करून हिंद महासागरात सुरक्षितरीत्या उतरले. ऑगस्ट महिन्यात झालेल्या स्टारशिप फ्लाइट १० मोहिमेतही रॉकेटने “सॉफ्ट लँडिंग” आणि स्प्लॅशडाउन केले होते, ज्यामुळे या वर्षातील अपयशांच्या मालिकेला पूर्णविराम मिळाला आहे.

Exit mobile version