“सिंधूचे पाणी अडवल्यास हल्ला करू” पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून पोकळ धमकी

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव

“सिंधूचे पाणी अडवल्यास हल्ला करू” पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून पोकळ धमकी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे. भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. अशातच शनिवार, ३ मे रोजी भारताने मोठा निर्णय घेत पाकिस्तानकडून होणारी आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होणार आहे. असे असूनची पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्याने भारताला पोकळ धमक्या देण्याचे आणि वादग्रस्त विधाने करण्याचे काम सुरूचं आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने थेट पाकिस्तानकडे बोट करत कठोर भूमिका घेतली. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले, वाघा-अटारी सीमा बंद केली यासोबतच, सिंधू पाणी कराराला स्थगितीही दिली. यावरुन पाकिस्तानचे धाबे दणाणले असून या निर्णयावरून पाकिस्तानी मंत्र्यांकडून आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, सिंधू करारांतर्गत देशाच्या वाट्याचे पाणी वळविण्यासाठी भारताने बांधलेली कोणतीही रचना (धरण) नष्ट केली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांतच भारताने सिंधू जल करार रद्द केला होता, या नदीचे पाणी पाकिस्तानच्या ८० टक्के शेत जमिनीसाठी पाणी पुरवतो. तसेच पाकिस्तानी मंत्र्यांनी पुन्हा सांगितले की, भारताच्या कृतीकडे आक्रमकतेचा चेहरा म्हणून पाहिले जाईल.

भारताने सिंधू खोऱ्यात धरणे बांधण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तानची प्रतिक्रिया काय असेल असे विचारले असता, आसिफ म्हणाले की, “ हे पाऊल म्हणजे पाकिस्तानविरुद्ध आक्रमकता असेल. जरी त्यांनी (भारताने) अशा प्रकारचा स्थापत्य प्रयत्न केला तरी पाकिस्तान ती रचना नष्ट करेल.”

हे ही वाचा..

भारताला आयती संधी, पाकिस्तानच्या आयातीवर बंदी

संभलमधील सीओ अनुज चौधरी यांची बदली

काँग्रेस वर्किंग कमिटी आता पीडब्ल्यूसी झाली

“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार…” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे विधान?

ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी असेही म्हटले होते की, भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत आहे, परंतु आम्हाला भारतासोबत युद्ध सुरू करायचे नाही. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले. तर पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांनीही पाण्याच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केले होते. पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

Exit mobile version