पावलोपावली नाचक्की सहन कराव्या लागणाऱ्या पाकिस्तानला आता जागतिक बँकेनेही जबरदस्त दणका दिला आहे. सिंधू पाणी वाटप करार स्थगिती निर्णयात जागतिक बँक हस्तक्षेप करेल अशी आस लावून बसलेल्या पाकिस्तानला जागतिक बँकेने सत्यात आणले आहे. सिंधू पाणी कराराच्या निलंबनाच्या निर्णयाच्या निराकरणात जागतिक बँकेने स्वतःला दूर ठेवत हात काढून घेतले आहेत.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, जागतिक बँक या संस्थेची भूमिका ही केवळ सुविधा देणाऱ्याची (the world bank’s role is merely as a facilitator) आहे. जागतिक बँक या मुद्द्यावर काही हस्तक्षेप करेल आणि ही समस्या कशी सोडवेल याबद्दल माध्यमांमध्ये बरीच चर्चा आणि संभ्रम आहे. पण ते सर्व गोंधळलेले आहे. जागतिक बँकेची भूमिका फक्त एक सुविधा देणारी इतकीच आहे,” असे स्पष्ट मत अजय बंगा यांनी मांडले आहे.
We have no role to play beyond a facilitator. There’s a lot of speculation in the media about how the World Bank will step in & fix the problem but it’s all bunk. The World Bank’s role is merely as a facilitator
-World Bank President, Ajay Banga on #IndusWaterTreaty Suspension… pic.twitter.com/6bbiZpKf0o
— PIB India (@PIB_India) May 9, 2025
अजय बंगा यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरलेला असताना सरकारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, अजय बंगा हे उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधींसाठी देशात होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांनी चर्चाही केली.
हे ही वाचा :
कुतुबमिनार, लाल किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवली!
भारतीय आणि विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्याबाबत फ्रँचायझी संभ्रमात
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय ‘हीरोज’ला सलाम, म्हणाले – “जय हिंद!”
पीएसएल एक्स चे सामने युएईत हलवले
१९६० मध्ये जागतिक बँकेने सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावरून भारत- पाक यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या वादात हस्तक्षेप केला होता आणि दोन्ही राष्ट्रांना करारावर स्वाक्षरी करण्यास मदत केली होती. करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी नऊ वर्षे लागली. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ६५ वर्षे सुरू असलेला आणि तीन भारत-पाक युद्धे आणि अनेक चकमकींमध्ये टिकून राहिलेला करार रद्द केला. पाकिस्तानसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सिंधू, रावी आणि झेलम या नद्या पाकिस्तानमधील ८० टक्के शेतीला पुरवतात. यांचे पाणी बंद झाल्याचे पाकिस्तानचे कृषी क्षेत्र आणि अर्थव्यवस्था दोन्ही ढासळू शकतात अशी शक्यता आहे. भारताने करार रद्द केल्यावर पाकिस्तानने याला युद्धाची कृती म्हणत यावर टीका केली होती.
