लंडनमधील ISKCON रेस्टॉरंटमध्ये चिकन खाणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

धार्मिक भावना दुखावल्याने संताप

लंडनमधील ISKCON रेस्टॉरंटमध्ये चिकन खाणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

लंडनमधील ISKCON (Govinda) रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती चिकन खाताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कर्मचारी स्पष्टपणे हे रेस्टॉरंट शाकाहारी असल्याचे सांगत असतानाही त्याने केएफसीमधील चिकन बाहेर काढून खाल्ले. या व्यक्तीला इतर ग्राहकांनी विरोध केला. शेवटी सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले

या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आणि अनेकांनी याला हिंदूविरोधी द्वेष आणि सांस्कृतिक अपमान म्हटले

घटना नेमकी काय होती?

हा व्हिडिओ एका अफ्रिकन-ब्रिटिश दिसणाऱ्या व्यक्तीचा आहे, ज्याने लंडनमधील ISKCON च्या Govinda नावाच्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जाऊन केएफसीमधील चिकन खाल्ले.

व्हिडिओमध्ये तो विचारतो, हे शाकाहारी रेस्टॉरंट आहे का?  त्यावर महिला कर्मचारी उत्तर देते, हो, इथे मांस, कांदा, लसूण मिळत नाही.

या माहिती नंतरही, तो त्याच्या बॅगमधून केएफसीच्या फ्राईड चिकनचा बकेट काढतो आणि तिथेच खाण्यास सुरुवात करतो. इतकंच नाही, तर तो इतर ग्राहकांना आणि कर्मचार्‍यांनाही चिकन देऊ करतो.

ग्राहकांचा विरोध आणि कारवाई

एक ग्राहक त्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही येथील नियमांचा भंग करत आहात आणि हे योग्य नाही. परंतु तो तरीही अडून राहतो. शेवटी, सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात येते आणि त्याला रेस्टॉरंटबाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा:

पावसात ‘नीम’चे महत्त्व वाढते

बोनालू उत्सवात भक्तांची मोठी गर्दी

युवकाला गोळ्या घातल्याप्रकरणी दोघांना अटक

आनंद बक्षींना का झाला पश्चात्ताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“ही गोष्ट हिंदू धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने केली गेली आहे,” असे एका युजरने म्हटले. “हे केवळ बाहेरून अन्न आणणे नाही, तर धार्मिक परंपरेवर आघात आहे,” दुसऱ्याने लिहिले. “अशी कृती कोणत्याही सुसंस्कृत समाजात सहन केली जाऊ शकत नाही,” असे एका युजरने म्हटले.

हा प्रकार फक्त सोशल मीडिया स्टंट होता का? हिंदूधर्मीय भावना जाणूनबुजून दुखावण्यात आल्या का? स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

Exit mobile version