29.9 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरधर्म संस्कृतीहिंदुंवरील अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेशींना हॉटेल्समध्ये जागा नाही!

हिंदुंवरील अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेशींना हॉटेल्समध्ये जागा नाही!

आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतला निर्णय

Google News Follow

बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्यांकांवर आणि विशेषतः हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आता जगभरात दिसून येत असून निषेध केला जात आहे. जागतिक पटलावर हा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत तोवर कोणाही बांगलादेशी नागरिकाला सेवा देणार नाही, असा मोठा निर्णय आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे.

हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारतात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. यातच आता, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत तोवर कुणाही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी केली आहे.

बराक खोऱ्यातील कछार, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हायलाकांडी या तीन जिल्ह्यांमध्ये बांगलादेशींना प्रेवशबंदी करण्यात आली आहे. बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय यांनी शुक्रवारी सांगितले की, “बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीत जोवर सुधारत होत नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोवर आम्ही शेजारील देशाच्या कोणत्याही नागरिकाला बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ठेवणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. हा आमचा निषेध व्यक्त करण्याचा मार्ग आहे.” पुढे ते म्हणालं की, देशात पुन्हा एकदा स्थिरता परत येईल, यासाठी बांगलादेशातील नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत. परिस्थितीत सुधारणा झाली, तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो.

हे ही वाचा:

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

गेल्या काही दिवसांपूर्वी, बजरंग दलाने सिलचर येथे आयोजित जागतिक प्रदर्शनाच्या आयोजकांना शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशी उत्पादनांची विक्री करणारे दोन स्टॉल बंद करण्यास सांगितले होते आणि त्यांची मागणी मान्य करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा