25 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरलाइफस्टाइललाइफस्टाइल बदला, वजन आपोआप कमी होईल

लाइफस्टाइल बदला, वजन आपोआप कमी होईल

Google News Follow

Related

लठ्ठपणा एका दिवसात वाढत नाही. तो आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. अनेकदा जेव्हा वजन खूप वाढते, तेव्हाच आपण त्याकडे लक्ष देतो आणि मग विविध डायट, जिम किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आधार घेतो. परंतु अनेक वेळा काहीच नीट काम करत नाही. अशा वेळी हे समजणे गरजेचे आहे की वजन “कडक डायट”ने नव्हे, तर योग्य सवयींनी कमी होते. आपली जीवनशैली हळूहळू सुधारत चला आणि सातत्य ठेवा वजन नैसर्गिकरीत्या कमी होईल.

आयुर्वेदानुसार, जेव्हा आपल्या शरीराची “अग्नी” (पचनशक्ती) मंद होते, तेव्हा शरीरात मेद (चरबी) वाढतो. म्हणून वजन कमी करायचे असल्यास आहार आणि दिनचर्या सुधारली पाहिजे. १. सकाळचा नाश्ता टाळणे ही पहिली चूक आहे. अनेकांना वाटते की नाश्ता न केल्याने कॅलरी कमी होतील, पण उलट त्यामुळे भूक वाढते आणि दिवसभर जास्त खाल्ले जाते. त्यामुळे सकाळी हलका पण पौष्टिक नाश्ता घ्या. जसे की दलिया, ओट्स, फळे किंवा मूगचं चिल्ला. २. रात्री उशिरा जेवण करणे ही दुसरी चूक. उशिरा खाल्ल्याने पचन मंदावते आणि चरबी साठते. म्हणून झोपण्याच्या किमान दोन तास आधी हलके जेवण करणे उत्तम.

हेही वाचा..

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; घोषणाबाजी करत केली गर्दी

हायड्रोजन बॉम्ब कसला राहुल गांधींचा लवंगी तोटा

बांगलादेशातील चटगावमध्ये पुन्हा हिंसाचार

पार्थ पवारांचे जमीन खरेदी प्रकरण : काय म्हणाले मुख्यमंत्री ?

३. जंक फूड आणि गोड पदार्थांचे अति सेवन. यामध्ये साखर आणि तेल यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे इन्सुलिन वाढतो आणि शरीरात चरबी साठते. त्याऐवजी घरचे शिजवलेले अन्न, फळे किंवा गूळ यांसारखे नैसर्गिक पर्याय निवडा. तसेच कोल्ड ड्रिंक आणि गोड ज्यूसपासून दूर राहा. हे फक्त साखर वाढवतात, पोषण नाही देत. त्याऐवजी लिंबूपाणी, ताक किंवा नारळपाणी घ्या. ४. कमी पाणी पिणेही वजन वाढण्याचे कारण आहे. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो आणि टॉक्सिन साचतात. दिवसातून किमान ७-८ ग्लास कोमट पाणी प्या.

अनेक लोक कंटाळा किंवा ताण आला की खातात — याला इमोशनल ईटिंग म्हणतात. अशावेळी काहीतरी खाण्याऐवजी पाणी प्या, थोडं फिरा किंवा संगीत ऐका. आयुर्वेदानुसार, हळद, दालचिनी आणि मेथीचे पाणी शरीरासाठी हितावह असते. सकाळी कोमट पाणी आणि रात्री त्रिफळा जल घेतल्याने शरीर संतुलित राहते. ५. झोपेची कमतरता. नीट झोप न घेतल्याने हार्मोनल असंतुलन होते आणि भूक वाढते. दररोज किमान ७-८ तासांची झोप घ्या आणि झोपण्यापूर्वी मोबाइलपासून दूर रहा. ६. सतत बसून राहणेही धोकादायक आहे. लांब वेळ बसल्याने फॅट वाढते. प्रत्येक ४५ मिनिटांनी थोडे चालणे आणि दररोज ३० मिनिटे जलद चालणे किंवा योग करणे फायदेशीर ठरते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा