सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट (डीएसटी) अंतर्गत मोहालीस्थित स्वायत्त संस्था नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आयएनएसटी) यांनी सिंगल-युज पेट बॉटल्समुळे शरीरात होणाऱ्या नुकसानीवर संशोधन केले आहे. या संशोधनानुसार अशा प्लास्टिक बॉटल्समध्ये आढळणारे नॅनोप्लास्टिक थेट आपल्या जैविक प्रणालीवर परिणाम करतात. ही माहिती डीएसटीने गुरुवारी दिली. खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये आढळणारे नॅनोप्लास्टिक हे जगभरातील चिंतेचा विषय बनले आहेत. अलीकडच्या काळात मानवी शरीरात त्यांची उपस्थिती आढळली आहे, मात्र त्यान्चा नेमका परिणाम काय, हे अद्याप पूर्णपणे उलगडले नव्हते.
पूर्वीच्या अभ्यासांमध्ये प्लास्टिक पर्यावरण कसे प्रदूषित करते किंवा शरीराच्या ऊतींना कसा धोका पोहोचवते, यावर भर होता. पण मानवी आरोग्यास उपयुक्त असलेल्या ‘गट मायक्रोब्स’वर त्यांचा कसा परिणाम होतो, याची पुरेशी माहिती नव्हती. आयएनएसटीमधील केमिकल बायोलॉजी युनिटचे संशोधक प्रशांत शर्मा आणि साक्षी डागरिया यांच्या टीमला मानवाच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे पहिले स्पष्ट पुरावे मिळाले आहेत.
हेही वाचा..
सुरक्षित ट्रान्झॅक्शनसाठी वन-टॅप बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सोल्युशन
पश्चिम बंगाल : अखेर आमदार हुमायूं कबीरला घरचा रस्ता
ऑटोमोबाईल उद्योगाचे भविष्य उज्ज्वल
फिचने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज किती केला ?
त्यांनी निरीक्षणात पाहिले की, • नॅनोप्लास्टिकच्या दीर्घ संपर्कामुळे बॅक्टेरियाची वाढ, शरीरात स्थिरावणे आणि टिकून राहण्याची क्षमता कमी होते. • तर तणाव प्रतिक्रिया आणि अँटिबायोटिक प्रति संवेदनशीलता वाढते नॅनोस्केल अॅडव्हान्सेस जर्नलमधील पेपरमध्ये संशोधकांनी म्हटले आहे. “दररोज वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमधून तयार होणारे नॅनोप्लास्टिक हे बायोलॉजिकली अॅक्टिव्ह पार्टिकल्स असून, ते गट हेल्थ, रक्तातील स्थैर्य आणि पेशींच्या क्रियाशीलतेत अडथळा आणू शकतात.”
टीमने लॅबमध्ये पेट बॉटल्समधून नॅनोप्लास्टिक काढून तीन जैविक मॉडेल्सवर त्यांची चाचणी केली. • लैक्टोबॅसिलस रॅम्नोसस या उपयुक्त गट बॅक्टेरियावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम पाहिला. • अधिक प्रमाणात नॅनोप्लास्टिकमुळे रेड ब्लड सेल्सची झिल्ली खराब होत असल्याचे आणि सेल्स लवकर नष्ट होत असल्याचे दिसले. तसेच, दीर्घ काळ शरीरात राहिल्यास, • डीएनए डॅमेज, • ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (फ्री रॅडिकल्स वाढणे) • अॅपोप्टोसिस (पेशी स्वतःला नष्ट करणे). • इंफ्लेमेटरी सिग्नलिंग. • ऊर्जा व पोषकतत्वांचे मेटाबॉलिझम बदलणे असे गंभीर परिणाम होतात, असे निष्पन्न झाले.
संशोधकांनी नमूद केले, “नॅनोपार्टिकल्सचा दीर्घ संपर्क मानवी पेशींमध्ये सूज, डीएनए नुकसान आणि इतर जटिल प्रतिक्रियांना कारणीभूत ठरतो — जे मानवी आरोग्यासाठी पूर्वी अज्ञात असलेले धोके निर्माण करतात.” तसेच, हे निष्कर्ष शेती, पोषण आणि इकोसिस्टम यांच्या अभ्यासातही महत्त्वाचे ठरतील, कारण मायक्रोबियल संतुलन आणि प्लास्टिक प्रदूषण यांचा परस्पर संबंध आहे.







