सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची जाणीव अधिक वाढत असून होम लॉकर्सकडे कल वाढल्याचे गोदरेज एंटरप्रायझेसच्या सिक्युरिटी सोल्युशन्स विभागाच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘हॅपीनेस सर्व्हे’नुसार, ८३ टक्के भारतीयांनी वैयक्तिक मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे.
सर्व्हेनुसार, ५१ टक्क्यांहून अधिक सहभागींनी विश्वासार्ह होम लॉकर्सना पसंती दर्शवली असून यामागे सोन्यातील वाढती गुंतवणूक हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे निष्पन्न झाले. आधुनिक राहणीमानाशी सुसंगत डिझाइन, सुरक्षितता आणि कुटुंबाच्या आर्थिक-भावनिक सुरक्षेसाठी होम लॉकर्सकडे मागणी झपाट्याने वाढत असल्याचेही सर्व्हेतून समोर आले.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे बिझनेस हेड पुष्कर गोखले यांनी सांगितले की, “सोन्याच्या किंमती सतत वाढत असल्यामुळे ग्राहक मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाले आहेत. संपत्तीमध्ये गुंतवणूक वाढत असतानाच तिच्या सुरक्षेला देखील ग्राहक महत्त्व देत आहेत. या ट्रेंडमुळे ग्राहकांच्या गरजांनुसार नाविन्यपूर्ण, अर्थपूर्ण आणि डिझाइन-केंद्रित उत्पादने देणाऱ्या ब्रँड्ससाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.” गोदरेजने होम लॉकर्स क्षेत्रातील ८५ टक्के बाजारहिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
6डब्ल्यू-रिसर्च च्या अंदाजानुसार, भारतातील स्मार्ट लॉकर बाजारपेठ २०३० पर्यंत ११.८ टक्के सीएजीआरने विकसित होईल. ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञान आणि घरगुती सुरक्षिततेबाबतची वाढती जागरूकता या वाढीस चालना देत आहेत.
आज लॉकर्स केवळ सुरक्षेचे साधन न राहता शहरी व दुसऱ्या श्रेणीतील शहरांतील आधुनिक घरांचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. डिझाइनला महत्त्व देणारे ग्राहक सौंदर्य आणि खात्री यांचा मेळ साधणाऱ्या होम लॉकर्समध्ये गुंतवणूक करत असून, गोदरेजने या मागणीला पूरक उत्पादन श्रेणी बाजारात आणली आहे.
कंपनीने ग्राहकांना सहज उपलब्धता व विश्वास मिळावा यासाठी आधुनिक घरांसाठी विशेष डिझाइन केलेले लॉकर्स विकसित केल्याचेही कळते.







