कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणाऱ्या अनेक देशी पेयांपैकी सत्तूचे (भाजलेले हरभरे किंवा इतर धान्यांपासून जसे की जव, मका यापासून बनवलेले अत्यंत पौष्टिक पीठ) शरबत हे सर्वात फायदेशीर आणि पौष्टिक पेय मानले जाते. उन्हाळ्यात सत्तूला वरदान समजले जाते, कारण ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पोषणही देते.
सत्तू हा एक पारंपरिक भारतीय आहार असून, उन्हाळ्यात ताजेपणा आणि आरोग्याचा खजिना मानला जातो. चविष्ट असण्याबरोबरच तो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. सत्तूमुळे शरीराला थंडावा, ऊर्जा आणि आवश्यक पोषक घटक मिळतात, त्यामुळे तो सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार, रोज सत्तूचे सेवन केल्यास शरीर आतून मजबूत राहते आणि उष्णतेमुळे येणारा थकवा कमी होतो.
National Library of Medicine मध्ये प्रकाशित अहवालानुसार, सत्तूमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. फायबरमुळे मलविसर्जन नियमित राहते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. तसेच सत्तूमध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि इतर महत्त्वाचे खनिजे मुबलक प्रमाणात असतात. भारतातील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सत्तूचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. हे मुख्यतः हरभरा, गहू, ज्वारी किंवा बार्ली (ज्वारी) यांसारख्या धान्यांना भाजून दळून तयार केले जाते.
सत्तूमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सत्तूचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीराला थंड ठेवते. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, अशावेळी सत्तूचे शरबत तहान भागवण्याबरोबरच ऊर्जा देते. तसेच ते पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
हे ही वाचा:
भारताकडे येणाऱ्या दोन एलपीजी टँकर्सनी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली
राजस्थानच्या जोधपुरमध्ये मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक
“पश्चिम बंगाल एकमेव राज्य, जिथून घुसखोर भारतात येऊन अशांतता निर्माण करतात”
“मोजतबा खामेनी, मरण पावलेत किंवा त्यांची प्रकृती गंभीर”
सत्तूचे विविध प्रकारे सेवन करता येते. उन्हाळ्यात थंड सत्तू शरबत सर्वाधिक लोकप्रिय आहे. मीठ, लिंबू, जिरे पूड किंवा गूळ घालून तयार केलेले शरबत चविष्ट तर असतेच, पण उष्णतेपासून संरक्षणही करते. याशिवाय सत्तूपासून लाडू, पराठे, चपाती किंवा सत्तूचे पेय (घोल)ही बनवले जाते. सत्तूमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बद्धकोष्ठता, आम्लपित्त यांसारख्या समस्या कमी होतात. तसेच ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, रक्तदाब संतुलित ठेवते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही सहाय्यक ठरते.







