28 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरलाइफस्टाइलवाढत्या वयात फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी ‘हा’ रामबाण उपाय करून पहाच!

वाढत्या वयात फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी ‘हा’ रामबाण उपाय करून पहाच!

Google News Follow

Related

वाढत्या वयासोबत अनेकजण व्यायामापासून दूर जातात, आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि हळूहळू हाडे कमकुवत होत जातात. यामुळे पुढे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. मात्र, एका नव्या संशोधनानुसार व्यायामानंतर दूध पिण्याची साधी सवय वृद्धापकाळात हाडांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते. या अभ्यासानुसार, नियमित व्यायामासोबत दूध पिल्यास ज्येष्ठ नागरिकांमध्ये जीवघेण्या फ्रॅक्चरचा धोका कमी होऊ शकतो. हे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ न्यूट्रिशन, हेल्थ अँड एजिंग’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. संशोधकांनी तपासले की व्यायामानंतर प्रोटीनचे सेवन केल्यास वृद्धांच्या हाडांना फायदा होतो का.

शास्त्रज्ञांना आढळले की प्रोटीन हाडांच्या मजबुतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ते कॅल्शियमचे शोषण वाढवते. कॅल्शियम हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक खनिज आहे आणि वृद्धापकाळात पडल्यास फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास मदत करते. गायीचे दूध आणि सोया दूध हे प्रोटीनचे सोपे व परिणामकारक स्रोत म्हणून ओळखले गेले. या अभ्यासात ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ८२ निरोगी प्रौढांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींना अशी कोणतीही वैद्यकीय समस्या नव्हती ज्यामुळे प्रोटीनचे सेवन किंवा हाडांच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. सर्वांनी आठ आठवड्यांचा नियमित व्यायाम कार्यक्रम पूर्ण केला. यात रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि संतुलन प्रशिक्षणाचा समावेश होता. सहभागींना चार गटांमध्ये विभागण्यात आले. एक गट फक्त व्यायाम करणारा होता, तर इतर दोन गट व्यायामानंतर गायीचे दूध किंवा सोया दूध पिणारे होते.

हे ही वाचा:

भारतावर २६/११ सारखा हल्ला करू! पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराने अल्लाहच्या नावाने घेतली शपथ

२०२८ पर्यंत भारताला मिळणार पहिले स्वदेशी मरीन इंजिन!

पवन हंस हेलिकॉप्टरचे अंदमानच्या समुद्रात क्रॅश-लँडिंग

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे कॅनडीयन नागरिकत्व होणार रद्द

गायीचे दूध घेणाऱ्या गटातील सहभागी व्यक्तींनी व्यायामानंतर एका तासाच्या आत २४० मिली लो-फॅट दूध पिले. सोया दूध घेणाऱ्या गटाला थोड्या कमी प्रमाणात दूध देण्यात आले, जेणेकरून प्रत्येक सत्रात सुमारे ७ ते ८ ग्रॅम प्रोटीनचे सेवन होईल. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा समतोल राखण्यासाठी दोन्ही दूध घेणाऱ्या गटांनी प्रत्येक प्रशिक्षण सत्रानंतर ६० ग्रॅम उकडलेली रताळीही खाल्ली. हा कार्यक्रम आठ आठवडे सुरू ठेवण्यात आला. आठ आठवड्यांनंतर सर्वाधिक सकारात्मक परिणाम गायीचे दूध पिणाऱ्या गटात दिसून आला. हे सहभागी अधिक चपळ आणि सक्रिय दिसले, तसेच त्यांच्या हाडांची मजबुतीही वाढलेली आढळली. या आधारे संशोधकांनी निष्कर्ष काढला की नियमित व्यायामासोबत दूध पिणे हे वृद्धांमध्ये हाडांची कमजोरी टाळण्यासाठी आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा