34 C
Mumbai
Saturday, April 11, 2026
घरराजकारणछगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये का उतरलं?

छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये का उतरलं?

थोडक्यात बचावले मंत्री महोदय, अपघाताची चौकशी सुरु

Google News Follow

Related

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरबाबत एक धक्कादायक घटना घडली. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते खानवडी गावाकडे जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरने नियोजित हेलिपॅडऐवजी थेट कार पार्किंगमध्ये लँडिंग केले. या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही दिवसापुर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजिक पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे या अपघातामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अपघाताची चर्चा ही सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने पार्किंगमधील मोकळ्या जागेला हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर खाली उतरवले. लँडिंगच्या वेळी उडालेल्या धुळीमुळे दृश्यता कमी झाली होती, ज्यामुळे पायलटला योग्य हेलिपॅड ओळखण्यात अडचण आली. ही स्थिती ‘ब्राउनआउट’ म्हणून ओळखली जाते आणि हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. सुदैवाने त्या ठिकाणी मोठी गर्दी किंवा वाहनांची वर्दळ नव्हती, त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
हे ही वाचा:
मुंबई-गोवा महामार्ग जूनपासून सुसाट; गडकरींचा शब्द

जखमी अवस्थेतूनही मोज्तबा खामेनेई शांतता चर्चांमध्ये सहभागी

उत्कर्ष २.०: बँकिंग सेवा अधिक स्मार्ट आणि ग्राहक-केंद्रित होणार

भारत- अमेरिका सिव्हिल न्यूक्लियर ऊर्जा क्षेत्रात एकत्र करणार काम

घटनेनंतर भुजबळ यांनी स्वतः सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. हेलिकॉप्टर नंतर योग्य हेलिपॅडवर हलवण्यात आले आणि कार्यक्रमही नियोजितप्रमाणे पार पडला. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणात नागरी उड्डाण नियमांचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जाणार असून नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (डीजीसीए) अहवाल पाठवला जाण्याची शक्यता आहे. पायलटवर कारवाई होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, हेलिकॉप्टर लँडिंग करताना अचूक समन्वय, स्पष्ट मार्किंग आणि योग्य दृश्यता अत्यंत महत्त्वाची असते. अशा चुका टाळण्यासाठी अधिक कठोर नियम आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

ही घटना पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. एक छोटी चूक मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते, याची जाणीव या प्रसंगातून झाली. मात्र योग्य वेळी परिस्थिती नियंत्रणात राहिल्याने मोठा अनर्थ टळला, ही दिलासादायक बाब आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा