29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारणरस्त्यावरच्या संघर्षातून आम्हीही माघार घेणार नाही!

रस्त्यावरच्या संघर्षातून आम्हीही माघार घेणार नाही!

नागपूरच्या महापदयात्रेतून फडणवीसांचा एल्गार

Google News Follow

राहुल गांधी यांनी संसदेत नव्हे, तर आता रस्त्यावर लढाई होणार असल्याचे विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नागपुरातून थेट आव्हान दिले आहे. ‘जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान अस्तित्वात आहे, तोपर्यंत देशातील लढाई संसदेतच होईल. मात्र, रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली, तर आम्हीही मागे हटणारे नाही,’ अशा आक्रमक शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. नागपुरात भाजप आणि महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महापदयात्रेपूर्वी झालेल्या सभेत ते बोलत होते.

राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस यांनी थेट संख्याबळाचे आव्हान दिले. ते म्हणाले, ‘तुम्ही एक जण येणार असाल, तर आम्ही एक हजार जण येऊ. तुम्ही हजार जण येणार असाल, तर आम्ही एक लाख जण येऊ आणि तुम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलात, तर आम्ही एक कोटी लोकांना घेऊन मैदानात उतरू. हा भारताचा हुंकार असेल.’ त्यांच्या या विधानातून विरोधकांच्या रस्त्यावरील आंदोलनाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

आशुतोष रांका, सौरव दासची गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी

हरदीपसिंग पुरी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

यूजीसीच्या वादग्रस्त नियमांचा केंद्र सरकार घेणार फेरआढावा

फडणवीस यांनी हा संघर्ष केवळ भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. ही लढाई देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. संविधानाच्या संरक्षणासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर त्यांनी यावेळी जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, या महापदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा पदयात्रेचा मार्ग होता. राहुल गांधींचे विधान आणि फडणवीस यांचे प्रत्युत्तर यामुळे महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाला नागपुरातून नवे वळण मिळाले असून, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा