२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिला कानमंत्र

२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. २०२४ नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील ते २०४७ हे वर्ष आपले सगळ्यांचे लक्ष्य असले पाहिजे. त्यासाठी आपण विकासाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन पतप्रधानांनी केले.

दिल्लीतील प्रगती मैदान येथील सभागृहात ही बैठक झाली. मोदी म्हणाले की, २०४७ पर्यंतचा पुढील २५ वर्षांचा काळही अमृतकाल आहे याची खूणगाठ बांधून आपण वाटचाल केली पाहिजे.

मोदींनी सांगितले की, या २५ वर्षात म्हणजे २०४७ पर्यंत खूप काही बदलणार आहे. आपल्याकडे सुशिक्षित तरुणांचा मोठा वर्ग उपलब्ध होणार आहे. विविध क्षेत्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल.

हे ही वाचा:

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण

७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन

अमेरिकन गायिका मिलबेन राहुल गांधींवर उखडल्या

फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश

विविध मंत्रालयाचे सचिवही या बैठकीला उपस्थित होते. या मंत्रालयांनी २५ वर्षातील वाटचालीचा आराखडा इथे सादर केला.
पतप्रधानांनी मंत्र्यांच्या झालेल्या या बैठकीची छायाचित्रे ट्विट करत ही बैठक फलद्रूप ठरल्याचे म्हटले तसेच अनेक धोरणांवर विचारांचे आदानप्रदान झाले, असेही मोदी म्हणाले.

Exit mobile version