28 C
Mumbai
Thursday, April 30, 2026
घरराजकारणख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे कमल हासन म्हणतात, सनातन धर्माच्या साखळ्या तोडा!

ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे कमल हासन म्हणतात, सनातन धर्माच्या साखळ्या तोडा!

हिंदुत्ववाद्यांकडून टीका

Google News Follow

Related

तामिळ अभिनेते कमल हासन हे सध्या चर्चेत आहेत. पूर्णवेळ हिंदूविरोधी आणि नास्तिक म्हणवल्या जाणाऱ्या कमल हासन यांनी एकदा ख्रिस्त धर्माचा प्रचार केल्याची कबुली दिली होती. आता त्यांनी “सनातन धर्माच्या साखळ्या तोडण्याची” इच्छा व्यक्त केली आहे.

३ ऑगस्ट २०२५ रोजी चेन्नईतील अगरम फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना हासन म्हणाले, “शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे जे हुकुमशाही आणि सनातन धर्माच्या साखळ्या तोडू शकते.”

मक्कल नीधी मय्यम (MNM) पक्षाचे संस्थापक हासन पुढे म्हणाले, “हातात दुसरे काही घेऊ नका, फक्त शिक्षण घ्या. आपण शिक्षणाशिवाय जिंकू शकत नाही, कारण बहुमत तुम्हाला हरवू शकते. बहुमतातील मूर्ख लोक तुम्हाला हरवतील;  म्हणूनच आपण शिक्षणाचा हात घट्ट धरून ठेवला पाहिजे.

हासन यांच्या या विधानांवर हिंदू समाजात संताप व्यक्त करण्यात आला असून विरोधी पक्षांनीही टीकेचा सूर लावला आहे.

तमिळीसाई सौंदरराजन यांचा हल्ला

हासन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तमिळनाडू भाजपा नेत्या तमिळीसाई सौंदरराजन म्हणाल्या, “कमल हासन यांनी आधी भाषेच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये फूट पाडली, आता ते धर्माच्या आधारावर लोकांना विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मी विचारते की, तुम्ही सनातन धर्माविषयी का बोलता? जर ते सनातनबद्दल बोलतील तर उदयनिधी आणि स्टालिन खूश होतील, पण तमिळनाडूतील लोक असंतुष्ट होतील. केवळ तमिळनाडूतीलच नाही, तर संपूर्ण भारतातील सनातन विचारसरणी असणाऱ्यांच्या भावना दुखावल्या जातील… मी या विधानाचा तीव्र निषेध करते.”

हे ही वाचा:

एमसीडी अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना पकडले

बंगालच्या कूचबिहारमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला!

ब्रह्मोस क्षेपणास्त्र व ड्रोन उत्पादनामुळे अलीगडला नवी ओळख

गंभीर व दुर्मीळ कर्करोगाचं उपचार आता गोरखपूरमध्ये!

याआधी, डीएमके नेते आणि तमिळनाडू मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचे खुले आवाहन करत वादग्रस्त विधान केले होते. स्टालिन म्हणाले होते, “डेंग्यू, मलेरिया, कोरोना हे आपण विरोध करुन थांबवत नाही, तर नष्ट करतो. त्याचप्रमाणे सनातन धर्मालाही नष्ट करायला पाहिजे.” कमल हासन यांनी तेव्हाही स्टालिनच्या विधानाचे समर्थन केले होते.

कमल हासन यांच्या हिंदूविरोधी विधानांचा इतिहास

२०१९ मध्ये हासन म्हणाले होते की, भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता – नथुराम गोडसे. २०१७ मध्ये त्यांनी हिंदू संघटनांना हिंसक म्हटले होते.  राजा चोळ हिंदू नव्हते, असे विधान केले होते. ‘केरळ स्टोरी’ चित्रपटाला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत त्यांनी हिंदू मुलींच्या इस्लामिक कट्टरतावादाच्या शिकार होण्याकडे दुर्लक्ष केले.

चित्रपटांद्वारे हिंदू देवतांचा उपहास

कमल हासन यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांतून हिंदू देवतांचा उपहास केला आहे. ‘काधला काधला’ (१९९८) मध्ये भगवान मुरुगन यांची टिंगलटवाळी करण्यात आली होती. ‘पम्मल के. संबंदम’ (२००२) मध्ये भगवान शिवाला बबल गम फुगवताना दाखवले. शैव धर्माच्या अनुयायांची बदनामी केली गेली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा