‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज (मंगळवारी) अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी काही महिन्यांपासून सुरु असलेल्या झालेल्या मतभेदानंतर त्यांनी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

“मी आज माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांना पाठवला आहे. माझ्या राजीनाम्याची कारणे मी नमूद केली आहेत. ‘पंजाब लोक काँग्रेस’ हे माझ्या नव्या पक्षाचे नाव आहे. असे अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर सांगितले.

सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात सिंग म्हणाले की, “सिद्धूचा प्रसिद्धीचा एकच डाव आहे की तो माझ्या आणि माझ्या सरकारवर खोटे आरोप करतील. त्याला राहुल आणि प्रियंका यांनी आश्रय दिला होता, तर तुम्ही या माणसाकडे दुर्लक्ष करण्‍याचे निवडले होते, ज्याला हरीश रावत, कदाचित सर्वात संशयास्पद व्यक्ती, यांनी मदत केली होती.” असे माजी मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा:

आसाममध्ये भाजपाला निर्भेळ यश

भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य

जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी सांगितले की पक्षश्रेष्टींनीं आपल्याला ज्या प्रकारे वागणूक दिली त्याबद्दल त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटले. काँग्रेसच्या मोजक्या प्रादेशिक नेत्यांपैकी एक असलेले सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी काही वेळातच राजीनामा दिला.

Exit mobile version