श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सरकार बदलण्यासाठी ज्या प्रकारे निदर्शने झाली तशीच निदर्शने भारतातही झाली पाहिजेत, असे वादग्रस्त वक्तव्य इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंग चौटाला यांनी केले. यानंतर ते टीकेचे धनी ठरले असून भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, चौटाला यांनी या घटनांचा उल्लेख केला आणि म्हटले की, सध्याच्या सरकारला सत्तेवरून खाली पाडण्यासाठी भारतातही अशाच युक्त्या राबवाव्या लागतील.
“सध्याच्या सरकारला सत्तेवरून खाली फेकून द्या” असे त्यांनी केलेले वक्तव्य, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लवकरच व्हायरल झाले आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. श्रीलंकेत, बांगलादेशात तरुणांनी सरकारला देश सोडण्यास भाग पाडले, ज्या प्रकारे नेपाळमधील तरुणांनी सरकारला देश सोडण्यास भाग पाडले, त्याच पद्धतीने भारतातही सध्याच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी त्याच पद्धती राबवाव्या लागतील, असा उल्लेख त्यांनी केला.
हे ही वाचा:
भाजपा, महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध विजयी
जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक
चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार
२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चौटाला यांच्या वक्तव्याला भारताच्या संवैधानिक व्यवस्थेसाठी आणि लोकशाही नियमांसाठी धोका असल्याचे म्हटले. पूनावाला यांनी असे विधान केले की, अशा प्रकारचे वक्तव्य काही विरोधी नेत्यांमध्ये असलेल्या संविधानविरोधी, भारतविरोधी वृत्तीचा पुरावा आहे. शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी ते लोकशाहीच्या विरोधात जातील आणि असा दावा केला की, यावरून असे दिसून येते की विरोधी पक्ष राष्ट्रीय हितांपेक्षा स्वतःचे हित जास्त ठेवत आहेत.
