मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सगळेच उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेले आहेत. मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करत असून रॅलीच्या माध्यमातूनही आपल्या प्रभागातील जनतेशी संवाद साधला जात आहे.
हे ही वाचा:
फ्लाइटमध्ये पॉवर बँक वापरण्यावर बंदी
२४ चिप डिझाइन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता
अश्विनी वैष्णव यांनी केली वंदे भारत स्लीपर ट्रेनची पाहणी
भारतीयांचे ५२ हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान
महायुतीचे वॉर्ड क्रमांक ४५ चे उमेदवार संजय कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाल्यानंतर कांबळे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू झाला आहे. वॉर्ड क्रमांक ४५ मधून भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार संजय कांबळे यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यात आमदार अतुल भातखळकर सहभागी झाले होते. अंबिका माता मंदिर, गोविंद नगर मालाड पूर्व येथे दर्शन घेतल्यानंतर महारॅलीची सुरुवात करण्यात आली. संजय कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार भातखळकर यांनी केले. कांबळे यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यांचा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया आमदार भातखळकर यांनी व्यक्त केली.
