‘मुंबईच्या जनतेने केला उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा वध’

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा संताप

‘मुंबईच्या जनतेने केला उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा वध’

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) पराभूत झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुंबईच्या जनतेने उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा वध केला आहे. मुंबईने उद्धव ठाकरे यांना दाखवून दिले आहे की, हे शहर केवळ विकासासाठीच चालणार आहे.

आयएएनएसशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, लूटमार, जबरदस्तीने वसुली, दहशतीचा वापर, धमकावणे किंवा हल्ले करणे हेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे काम होते. मात्र निवडणूक निकालांद्वारे मुंबईकरांनी त्यांना आपले उत्तर दिले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव ‘उद्धव सेना मुंबई’ किंवा ‘उद्धव सेना मुस्लिम’ असे ठेवले पाहिजे, कारण त्यांच्या जागा फक्त मुंबईपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.

हे ही वाचा:

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान होताच समितीने काय म्हटले?

४० हून अधिक खटले असलेला नक्षलवादी कमांडर पापा राव ठार

देवेंद्रच मुंबईचा धुरंधर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर #रसमलाई होतेय ट्रेंडिंग; विषय काय?

भाजप नेत्यांनी असेही सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत राज ठाकरे यांचा वापर केला. निकालांवरून स्पष्ट होते की, राज ठाकरे यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बाजूला सारतील.

भाजप आमदार राम कदम यांनीही जोरदार हल्ला चढवताना सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्रात दोन भावांनी आपल्या ब्रँडची मोठ्या प्रमाणात चर्चा केली. मात्र निवडणूक निकालांनंतर मनसेला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ १३ नगरसेवक मिळाले आहेत. आपल्या वडिलांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वडिलांनीच दंड दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ते केवळ १५० जागांवरच सीमित राहिले आहेत.

राम कदम पुढे म्हणाले की, ठाकरे बंधूंना माध्यमांत मोठी प्रसिद्धी मिळाली, मात्र त्यांना ना जनमत मिळाले, ना कोणताही ठोस आधार उरला आहे. त्यांनी सांगितले की, भाजपाने स्वतःचा जुना विक्रम मोडीत काढला असून, आमच्याकडे संपूर्ण राज्यात सुमारे १५०० नगरसेवक आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राम कदम म्हणाले की, ज्या ठिकाणी मनसेची सत्ता होती तेथील जनतेने त्यांना जवळपास पूर्णपणे नाकारले आहे. मुंबईतही मनसेचे केवळ सहा उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांनी हे मान्य केले पाहिजे की, ते १३ जागांपुढे पुढे जाऊ शकलेले नाहीत.

Exit mobile version