मुहूर्त ठरला : मराठवाड्यातील काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार

काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्यालसह माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुहूर्त ठरला : मराठवाड्यातील काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला पक्षात खिंडार पाडल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर हे उद्या म्हणजेच मंगळवारी (29 जुलै ) भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे माहिती आहे.

या पक्ष प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या पक्षप्रवेशामुळे जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपने स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा राजकीय झटका दिल्याचेही बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारणात घडत असलेली ही मोठी घडामोड असून या मुळे मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे. तर याचा कितपत फायदा भाजपला निवडणुकांमध्ये होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version