जम्मू काश्मीरमधील ‘लष्कर’, ‘हिजबुल’शी संबंधित तीन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली कारवाई

जम्मू काश्मीरमधील ‘लष्कर’, ‘हिजबुल’शी संबंधित तीन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मंगळवारी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तीन सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. या कर्मचाऱ्यांचे संबंध लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि हिजबुल मुजाहिदीन या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बडतर्फ करण्यात आलेले कर्मचाऱ्यांमध्ये – एक पोलीस शिपाई, एक शाळेचा शिक्षक आणि श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. त्यांना घटनेच्या अनुच्छेद ३११(२)(c) अंतर्गत बडतर्फ करण्यात आले असून, या कलमानुसार राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी चौकशीविना सेवामुक्ती देता येते. हे सर्वजण सध्या तुरुंगात आहेत.

आतापर्यंत ७५ हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवादी संबंधांमुळे सेवेतून काढण्यात आले आहे, असे एलजी प्रशासनाने सांगितले. हे कारवाईचे पाऊल दहशतवादी यंत्रणेवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग आहे, ज्यामध्ये ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) आणि सरकारी यंत्रणांमध्ये लपलेले सहानुभूतीदार यांचाही समावेश आहे.

बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी मलिक इश्फाक नसीर – पोलीस शिपाई, अजाज अहमद – शालेय शिक्षक, वसीम अहमद खान – कनिष्ठ सहाय्यक, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, श्रीनगर असे आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कर्मचारी सक्रिय दहशतवादी सहकारी होते, जे लॉजिस्टिक्स, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये मदत करत होते.

हे ही वाचा:

एकेकाळचा वेगवान योद्धा आता उपचाराच्या मैदानात

महिला क्रिकेटला नवे शिखर गाठायला सज्ज

सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते…

…आणि अशा पद्धतीने रशियन विमानांना बेमालुमपणे युक्रेनने उद्ध्वस्त केले!

 पोलीस शिपाई मालिक इश्फाक नसीर

  पत्रकार शुजात बुखारी यांच्या जून २०१८ मध्ये झालेल्या हत्या कटात सहभागी.

एलजी मनोज सिन्हा यांनी २०२० मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर दहशतवाद्यांचे नेटवर्क तोडण्यासाठी उद्दिष्टबद्ध धोरण राबवले आहे.

Exit mobile version