मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग

मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग

महाराष्ट्रातील मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. तर नगरपंचायतीलाही एक सदस्यीय पद्धत असेल. बुधवार, २२ सप्टेंबर रोजी ठाकरे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सर्व महापालिकांसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार होत्या. निवडणूक आयोगाने पत्रक काढून त्या संबंधीची घोषणा केली होती. पण या निर्णयावर राजकीय मंडळींमध्ये अनेक वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले होते. त्यानुसारच आता ठाकरे सरकारने निर्णय घेऊन मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे.

हे ही वाचा:

सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?

आयपीएलवर पुन्हा कोरोना संकट

पंजाबनंतर हरियाणामध्ये काँग्रेसवर संकट

भारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश

त्यामुळे आता ठाणे, उल्हासनगर, भिवांडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत.

या आधी २०१७ साली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नुसारच या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. तेव्हादेखील मुंबईमध्ये फक्त एक सदस्यीय प्रभाग होते. तर इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती होती.

Exit mobile version