“दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका

“दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही…”

 

मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच आता राहिलेली नाही,” असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नसून, केवळ मुंबईतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुंबईकरांना भावनिक मुद्द्यांवर गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र जनता आता सुज्ञ झाली असून अशा राजकारणाला बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदानाच्या दिवशी ‘भगवा गार्ड’सारख्या संकल्पना पुढे करून मतदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. मात्र मुंबईत कोणत्याही प्रकारची दहशत माजवू दिली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असून नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
हे ही वाचा:
एअर इंडिया अपघात: दिवंगत पायलट कॅप्टनच्या पुतण्याला चौकशीसाठी समन्स

जॉर्जियाहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडले आणि…

सरसंघचालक मोहन भागवत, सचिन तेंडूलकरसह बॉलीवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लष्कर ए तोयबाच्या तोफा पाकिस्तान विरुद्ध वळतायत का भारताचे धुरंधर नव्या मिशनवर ?

उत्तर भारतीयांविरोधात केले जाणारे वक्तव्य मुंबईच्या एकात्मतेला धक्का देणारे असल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबई ही सर्वांची आहे. भाषा, प्रांत किंवा जातीच्या नावाखाली समाजात फूट पाडणे चुकीचे असून सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने मुंबईच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली असल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पारदर्शक प्रशासन आणि विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे. भावनिक राजकारण नव्हे तर विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व मुंबईकरांना हवे आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

एकूणच, बीएमसी निवडणूक ही विकास विरुद्ध जुन्या पद्धतीच्या राजकारणाची लढाई असून, मुंबईकर योग्य निर्णय घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Exit mobile version