कम्युनिस्ट म्हणजे भित्री भागुबाई…निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल

यूपीआय शुल्काच्या मुद्द्यावर डावे नेते ब्रिटास यांना दिले उत्तर

कम्युनिस्ट म्हणजे भित्री भागुबाई…निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी भारतातील कम्युनिस्टांना “पूर्णपणे भित्रे” असे संबोधत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे खासदार जॉन ब्रिटास यांच्यावर यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याबाबत देशात संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केला.

राज्यसभेत कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६ यावरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी ब्रिटास सभागृहातून बाहेर गेल्याबद्दल आक्षेप घेतला. उत्पन्नकर (सुधारणा) अध्यादेश, २०२६ ला नामंजुरी देण्याचा ठराव मांडताना ब्रिटास यांनी सरकारवर आरोप केले होते. ५ जून २०२६ रोजी हा अध्यादेश जारी करण्यात आला होता.

ब्रिटास यांनी आरोप केला होता की, अमेरिकेच्या दबावामुळे सरकारने यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलवरही अशाच प्रकारचा दबाव आणण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भारताची डिजिटल पेमेंट व्यवस्था ही मोफत सार्वजनिक सुविधा म्हणून विकसित करण्यात आली आहे,” असे म्हटल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

उपसभापती हरिवंश यांनी काही काळ झालेल्या गोंधळानंतर ब्रिटास यांना ठराव मांडण्याची परवानगी दिली होती. मात्र, निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ भाषण केल्यामुळे सभापतींनी त्यांचे भाषण थांबवले. त्यानंतर ब्रिटास सभागृहातून बाहेर गेले.

हे ही वाचा:

इराणच्या धमकीमुळे ट्रम्प यांची पळापळ, विमानच बदलले!

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

राहुल गांधी भागो मत…च्या गजरात अमित शहा समर्थनार्थ संसद परिसरात मोर्चा

संसदेत गोंधळ घालण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक…

सीतारामन म्हणाल्या, “जॉन ब्रिटास यांनी माझे उत्तर ऐकायचे असेल तर त्यांनी येथे थांबावे. नेहमीची कम्युनिस्ट पद्धत म्हणजे तथ्य नसलेल्या गोष्टी सांगून सर्वांवर हल्ला करणे, तथ्यांचा विपर्यास करणे आणि ‘मला बोलण्याचा अधिकार आहे’ अशी मागणी करणे. पण प्रत्यक्षात त्यांना मुद्देनिहाय उत्तर दिले जाणार असेल, तेव्हा त्यांच्यात ते ऐकण्याचे धैर्य नसते. भित्रे!”

त्या पुढे म्हणाल्या, “या देशातील कम्युनिस्ट भित्रे भागुबाई आहेत; जॉन ब्रिटास यांनी हे सिद्ध केले आहे. त्यांना तथ्यांचा सामना करता येत नाही. मात्र ते सतत सभागृहाचे कामकाज लांबवण्याचा, गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत राहतात.”

विरोधी पक्षाच्या सदस्याने बोलण्याच्या अधिकाराचा उल्लेख केल्यावर सीतारामन यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्यांना ऐकण्याचा अधिकार नाही का? जेव्हा उत्तर दिले जात असते, तेव्हा मला असे म्हणावेसे वाटते की उत्तर देण्यासाठी उभे राहणे हा माझाही अधिकार आहे.”

चर्चेत सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांचे म्हणणे आपण ऐकून घेतो आणि त्यांच्या मुद्द्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, असे सीतारामन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “माननीय जॉन ब्रिटास यांनी येथे थांबून उत्तर ऐकले पाहिजे, कारण त्यांनी केवळ या सभागृहातच नव्हे तर संपूर्ण देशात संभ्रम निर्माण केला आहे. हीच कम्युनिस्टांची पद्धत आहे. पूर्णपणे असत्य.”

“अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी यूपीआयवर शुल्क आकारण्याचा आग्रह धरला आहे. ब्राझीलवरही असाच दबाव आणण्यात आला होता. आता सरकारचे धोरण पूर्णपणे बदलले जात आहे आणि त्यांनी या विधेयकात चलाखीने यूपीआयशी संबंधित तरतूद आणली आहे,” असा दावा ब्रिटास यांनी केला.

Exit mobile version