‘कॉक्रोच’वर पोलिस कारवाई नको, नाहीतर पुन्हा आंदोलन

पत्रकार परिषद घेत कॉक्रोच जनता पार्टीचा इशारा

‘कॉक्रोच’वर पोलिस कारवाई नको, नाहीतर पुन्हा आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीने सोमवारी केंद्र सरकारला इशारा देत जाहीर केले की, आंदोलनकर्त्यांवरील पोलिस कारवाई सुरूच राहिल्यास देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल. २५ जुलै रोजी झालेल्या कराराचे सरकार उल्लंघन करत असल्याचा आरोप कॉक्रोच पार्टीने केला आहे. शिवाय,

राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कॉक्रोच पार्टीने सांगितले की, सरकारने आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आणि नवीन गुन्हे दाखल न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवरील कारवाई, अटक आणि स्वयंसेवकांवर देखरेख सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला.

कॉक्रोच पार्टीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले, “२५ जुलै रोजी झालेल्या कराराची लेखी प्रत उद्यापर्यंत आम्हाला मिळाली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करण्यास बाध्य होऊ.”

हे ही वाचा:

कीर्तनकार, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या क्रांतिगीता ताई महाबळ यांचे निधन

‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम

ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम

बँक ऑफ बडोदामध्ये सायबर घुसखोरी; कर्मचाऱ्याचे ई-मेल हॅक

सरकारवर करारभंगाचा आरोप

कॉक्रोच जनता पार्टीचे आणखी एक प्रवक्ते अभिषेक रांका यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये सरकारवर करारभंगाचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत विद्यार्थ्यांना अटक करण्यात येत असून दिल्लीसह इतर राज्यांमध्ये स्वयंसेवकांवर देखरेख आणि छळ सुरू आहे.

रांका यांनी सर्व आंदोलनकर्त्यांवरील एफआयआर तातडीने मागे घेण्याची आणि दिल्ली पोलिस तसेच भाजप किंवा मित्रपक्षांच्या राज्यांतील पोलिसांनी नवीन गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी केली.

२५ जुलैच्या करारात काय ठरले?

धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच पार्टीने ४९ दिवसांचे आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर खालील मुद्द्यांवर सहमती झाल्याचा कॉक्रोच पार्टीचा दावा आहे.

“पोलिस कारवाई सुरूच”

सौरव दास यांनी सांगितले की, आंदोलन स्थगित झाल्यानंतर सरकार विद्यार्थ्यांना लक्ष्य करेल, अशी भीती त्यांना आधीपासूनच होती. कॉक्रोच पार्टीच्या सदस्या रत्ना सिंह यांनी दावा केला की, आसाममध्ये सात ते आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकात्यात ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी १० जण मुस्लिम आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिहारमध्ये ८६ जणांना अटक झाल्याचाही दावा त्यांनी केला.

 कायदेशीर मदत, सिबल यांचे एक कोटी

कॉक्रोच पार्टीने “साक्षी” नावाचे ऑनलाइन व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पोर्टलवर आंदोलनकर्ते पोलिस कारवाईशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे अपलोड करू शकतील.  कपिल सिब्बल यांनी आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी एक कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले. त्यांनी देशभरातील वकिलांना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

सिब्बल यांनी दिल्ली पोलिसांवर चेहरा ओळख तंत्रज्ञान वापरून आंदोलनकर्त्यांची ओळख पटवून त्यांना लक्ष्य केल्याचा आरोपही केला. दरम्यान, २५ जुलैच्या करारानंतर निर्माण झालेला विश्वास आता डळमळीत झाल्याचे चित्र दिसत असून पुढील २४ तासांत सरकार आणि CJP यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version