बेकायदेशीर बांगलादेशी रहिवाशाला मालवणीतून अटक

बेकायदेशीर बांगलादेशी रहिवाशाला मालवणीतून अटक

बेकायदेशीर रहिवाशांची धरपकड करण्याच्या मोहिमेत मुंबईच्या मालवणी येथील पोलिसांनी एका बांगलादेशी रहिवाशाला अटक केली आहे. हा इसम भारतात बेकायदेशीरपणे घुसला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मालवणी परिसरात गेल्या काही वर्षात तेथील मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचे आढळून आले आहे.

हे ही वाचा:

हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

पोलिसांनी या इसमावर पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलिस स्थानकाच्या दहशतवाद विरोधी पथकाला त्याच्या घरातून विविध नकली दस्तऐवज आणि कागदपत्रे देखील मिळाली आहेत.

पोलिसांनी बेकायदेशीर रहिवाशांविरूद्ध चालू केलेल्या मोहिमेतील ही दुसरी अटक आहे. आणखी एका माणसाला पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्या इसमाचे वय २४ वर्षे होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने या बाबत ट्वीट देखील केले आहे.

मालवणीमध्ये हिंदू रहिवाशांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल देखील न्युज डंकाने सविस्तर रिपोर्ट केला आहे. घुसखोर हे सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक असल्याने हा प्रश्न संवेदनशील झाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे नुकतीच दोन इसमांना अटक देखील करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अजूनही काही बेकायदेशीर रहिवासी पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version