महायुतीने २०० चा टप्पा ओलांडला, भाजपाचे शतक, तर शिंदेंचे अर्धशतक

नगरपालिका निवडणुकात दणदणीत यश

महायुतीने २०० चा टप्पा ओलांडला, भाजपाचे शतक, तर शिंदेंचे अर्धशतक

महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचे निकाल रविवारी यायला सुरुवात झाली आणि दुपारपर्यंत महायुतीने २०० जागांचा टप्पा ओलांडत महाविकास आघाडीचा पुरता बीमोड केल्याचे चित्र दिसले. नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार होते. त्यानुसार सर्वांचे लक्ष या निकालांकडे लागले होते.

महायुतीत धुसफूस आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडत आहेत, असे बोलले जात असताना तिघांनी मिळून या निवडणुकांवर जबरदस्त पकड घेतली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होईल, असा दावा केला जात होता, पण प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. आता निकालादरम्यान मात्र राज्यभरात महायुतीचंच वर्चस्व पहायला मिळाले आहे. महायुतीने २०० पेक्षा अधिक जागांवर यश मिळविले असून त्या भाजपाने ११८ तर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी ५९ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३६ जागी यश मिळविले होते. तर महाविकास आघाडीत काँग्रेसने ३३ जागी यश मिळविले होते पण उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना अनुक्रमे ९ आणि ८ जागी यश मिळाल्याचे दिसत होते. अर्थात, अद्याप सगळे निकाल जाहीर झालेले नाहीत त्यामुळे त्यात आणखी काही बदल होतील.

हे ही वाचा:

दाट धुक्यामुळे विमानसेवेचे वेळापत्रक विस्कळीत

बंगालमधील सर्व नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल

माउंट आबू मार्गावर नियंत्रण सुटून बस उलटली

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे ९९ लाखांची खंडणी

या निवडणुकांसाठी झालेल्या प्रचारसभांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं. मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते अशाप्रकारे प्रचारासाठी बाहेर गेले नव्हते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता.

गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घेतल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर २ आणि २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

Exit mobile version