सिद्धू मुसेवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई, शस्त्रसाठा जप्त

सिद्धू मुसेवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई, शस्त्रसाठा जप्त

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी सोमवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य शूटर्सना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. या दोन अटकेव्यतिरिक्त पोलिसांनी आणखी एकाला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित होते.मुसेवाला याच्यावर सहा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मुख्य आरोपी प्रियव्रत उर्फ ​​फौजी याला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन मुख्य शूटर्ससह तीन जणांकडून आठ ग्रेनेड, तीन पिस्तूल आणि सुमारे पन्नास गोळ्यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. गोळीबार करणाऱ्या सहा जणांची ओळख पटली आहे. गोल्डी ब्रारच्या संपर्कात असलेल्या नेमबाजांचे दोन मॉड्यूल या घटनेत सामील होते. मनप्रीत मनूने सिद्धू मुसेवालावर गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. १४ जून रोजी पंजाब पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली आणि त्याला एक दिवसाच्या ट्रान्झिट रिमांडवर पंजाबला नेले. पंजाब पोलिसांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात असा युक्तिवाद केला होता की त्यांच्या तपासादरम्यान असे आढळून आले आहे की लॉरेन्स बिश्नोई हा सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे आणि त्याची कोठडीत चौकशी आवश्यक आहे.

Exit mobile version