26 C
Mumbai
Tuesday, August 16, 2022
घरक्राईमनामाधक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

Related

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी विष प्राशन करून दोन भावांच्या कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली येथील मिरजपासून १२ किलोमीटरवर असणाऱ्या म्हैसाळमध्ये ही घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून या सर्वांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. म्हैसाळ गावातील अंबिका नगर येथे वनमोरे बंधू राहायला होते. रविवार, १९ जून रोजी एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवार, २० जून रोजी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली.

माणिक हे म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली आहे. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

हे ही वाचा:

मुंबई पालिकेत नोकरी लावतो सांगत आठ लाखांचा गंडा

चौथ्यादिवशीही राहुल गांधी ईडीच्या फेऱ्यात

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!

मृतांची नावे – माणिक वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
22,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा