सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे सेनेतील विलीनीकरणाला मान्यता

लोकसभा सचिवालयाचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे गटाची संसदीय ताकद वाढली

सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे सेनेतील विलीनीकरणाला मान्यता

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील सहा लोकसभा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाच्या प्रस्तावाला लोकसभा सचिवालयाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संसदेतील शिवसेनेचे राजकीय समीकरण बदलणार असून, शिंदे गटाचे संसदीय बळ आणखी वाढले आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला संसदेत मोठा धक्का बसला आहे. संबंधित सहा खासदारांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत स्वतंत्र गट म्हणून मान्यता आणि विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेनंतर त्यांचा संसदीय प्रवास आता अधिकृतपणे शिंदे गटासोबत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संसदेत शिंदे गटाची ताकद वाढणार असून आगामी संसदीय कामकाजात त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
लॉर्ड्सवर रोहित शर्माची अग्निपरीक्षा

अहमदाबादमध्ये फटाका कारख्यान्यातील भीषण स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू

पी. व्ही. सिंधूची थेट अंतिम फेरीत धडक

तृणमूलच्या खात्यांमधील १६४ कोटींच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णाचे स्वागत केले असून उद्धव ठाकरे यांनी टिका करण्या ऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार आता अधिकृतरित्या शिवेसेने आल्याची प्रतिक्रीया देखील त्यांनी दिली.

Exit mobile version