27.4 C
Mumbai
Sunday, July 19, 2026
घरस्पोर्ट्सपी. व्ही. सिंधूची थेट अंतिम फेरीत धडक

पी. व्ही. सिंधूची थेट अंतिम फेरीत धडक

Google News Follow

Related

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला आहे. चीनची जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची खेळाडू चेन युफेई हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उपांत्य फेरीचा सामना अर्धवट सोडून बाहेर पडली. त्यानंतर सिंधूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.

सामना सुरू असताना सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले होते. पहिला गेम तिने २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही ती १५-१० अशी आघाडीवर असताना चेन युफेईला दुखापतीमुळे सामना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पहिल्या गेममध्ये सिंधूने मध्यंतरापर्यंत चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र चेनने पुनरागमन करत सामना १९-१९ असा बरोबरीत आणला. निर्णायक क्षणी सिंधूने संयम राखत सलग दोन गुण मिळवून गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही सिंधूने जलद हालचाली आणि अचूक फटक्यांच्या जोरावर प्रतिस्पर्धीवर दबाव कायम ठेवला. मात्र चेन युफेई दुखापतीशी झुंज देत असल्याचे दिसून आले आणि अखेर तिने सामना अर्धवट सोडला.

३१ वर्षीय सिंधूने २०२६ हंगामाची सुरुवात जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावरून केली होती. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने आता ९वे स्थान गाठले असून तिच्या दमदार पुनरागमनाची ही मोठी नोंद मानली जात आहे.

रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची किंवा इंडोनेशियाच्या कुसुमा वरदानी यांच्यापैकी एका खेळाडूशी होणार आहे.

यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीआधी जपानच्या नोजोमी ओकुहारा हिने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सिंधूला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला होता. २०२३ च्या डेन्मार्क ओपननंतर सुपर ७५० स्पर्धेत सिंधूने प्रथमच उपांत्य फेरी गाठली असून, यंदाच्या हंगामातील हा तिचा तिसरा उपांत्य फेरीचा टप्पा ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा