26 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरराजकारणमी गांधीवादी, राहुलवादी नाही!

मी गांधीवादी, राहुलवादी नाही!

ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा संताप

Google News Follow

Related

काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी “मी राहुलवादी नाही” असे स्पष्टपणे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजयन सलग तिसऱ्यांदा सत्तेत येतील, असा अंदाज व्यक्त केला. तसेच त्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवरही जोरदार टीका केली.

विजयन सरकारबाबतच्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर अय्यर म्हणाले, “मी काँग्रेस पक्षातच आहे, मी पक्ष सोडलेला नाही. राहुल गांधी मला पक्षाचा सदस्य असल्याचे विसरले असावेत. त्यामुळे मी गांधीवादी आहे, नेहरूवादी आहे, राजीववादी आहे; पण मी राहुलवादी नाही,” असे त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख करत सांगितले.

या वक्तव्यामुळे विशेषतः केरळमध्ये, जिथे विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत.

विजयन पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा

अय्यर यांनी आगामी निवडणुकीत विजयन पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र त्यांनी एक अट घालत आपले विधान मागे घेण्याची तयारी दर्शवली. “व्ही. डी. सतीसन यांना पुढील मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन द्या, तर मी पिनरायी विजयन यांच्याबाबतचे विधान मागे घेईन,” असे ते म्हणाले. विजयन यांचे कौतुक करताना अय्यर म्हणाले, “ते अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहेत.”

हे ही वाचा:

मुंबई लक्झरी हौसिंग मार्केटचा नवा विक्रम

शेअर बाजारात जोरदार उसळी

दिल्लीत आजपासून ‘एआय’ परिषदेला सुरुवात

चीनच्या सिचुआनमध्ये अण्वस्त्र सुविधांचा होतोय विस्तार

 

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अय्यर यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आणि ते पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. अय्यर यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावरही निशाणा साधला. “शशी थरूर यांच्यासारखा तत्त्वहीन नेता मी पाहिलेला नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते के अण्णामलाई यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात आडवा व्यवहार असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मी काँग्रेसमध्येच आहे’

राजकीय भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान अय्यर यांनी स्पष्ट केले, “मी काँग्रेसमध्येच आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. काँग्रेसने मला बाहेर काढले तर मी माझा आवाज उठवेन.” त्यांनी सोनिया गांधी यांनी स्वतःला “लूज कॅनन” म्हटल्याचा उल्लेखही केला.

अय्यर यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबतही वादग्रस्त टिप्पणी केली. केरळमध्ये निवडणुका जवळ येत असताना अय्यर यांच्या विधानांमुळे काँग्रेससमोर अंतर्गत एकजुटीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा