औरंगजेबाची घोषणा देणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावणार

उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

औरंगजेबाची घोषणा देणाऱ्यांवर  ‘एमपीडीए’ लावणार

छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार मार्च पासून औरंगाबादच्या नामांतर विरोधात खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु असून यामध्ये त्यांनी औरंगजेबाचे फलक झळकवले. शिवाय औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचेही समोर आले आहे. म्हणून याप्रकरणात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा देणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी, काही लोकांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उद्दात्तीकरण केले जात असल्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी विशेष बाब याखाली करण्यात आली आहे.

अंबादास दानवे यांना सरकारकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार अशी ग्वाही देण्यांत आली आहे. याशिवाय आंदोलन कर्ते वेळेची मर्यादा न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणा देऊन नियमांचे उल्लंघन करतात. दरम्यान , गृहमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन सरकारकडून त्यांना करण्यात आले आहे. औरंगजेब याचे समर्थन आणि उद्दात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून योग्य ती तपासणी करावी असे निर्देश उपसभापती ‘नीलम गोऱ्हे’ यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर  

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

काय आहे प्रकरण?

औरंगाबादचे नामांतर केल्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. पण उपोषणाच्या पहिल्या दिवशी एका तरुणाने औरंगजेबाचे फोटो , पोस्टर झळकावले होते. त्यानंतर आयोजकांनी त्याला तिथून पिटाळून लावले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आरेफ अली, मीर फारूक अली यांच्या फिर्यादीनुसार पाच मार्चला अज्ञात चौघांविरुद्ध कलम १५३ अ , ३४ नुसार सिटीचौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. कोर्टात याचिका दाखल असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही औरंगजेबाचे समर्थक नाही. आजपर्यंत एकसुद्धा कार्यक्रम शहरात साजरा केला नाही. आंदोलनस्थळी ज्यांनी फोटो आणला होता,  त्याला आम्ही पिटाळल्याचे जलील यांनी सांगितले आहे.

Exit mobile version