28 C
Mumbai
Wednesday, April 8, 2026
घरराजकारणमेट्रोची 'नऊ'लाई; दहिसर-काशीगाव मार्गामुळे प्रवास आरामात

मेट्रोची ‘नऊ’लाई; दहिसर-काशीगाव मार्गामुळे प्रवास आरामात

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काशीगाव येथे मुंबई मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, ज्यामुळे मीरा-भाईंदर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर रितू तावडे आदि उपस्थित होते. ८ एप्रिल (बुधवार) पासून या मार्गावर प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आहे. २०१८ साली आपण याचं भूमिपूजन केलं होते. त्यांनंतर मुंबई मीरा-भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालंय मागच्या काळात याचे ट्रायल रनही आपण पाहिलं. दहिसर पूर्व ते काशीगाव ४.४ किमीच्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे. यात चार स्थानकं आहेत. मेट्रो ७ ला ही जोडणार आहे. दहिसर पू. पांडुरंगवाडी मीरागाव काशीगाव अशी चार स्थानकं आहेत. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नंगर सुभाष मैदान ९६ टक्के काम पूर्ण झालं आहे. याच वर्षी त्याचं द्घाटन व्हायला हवं. अजून ४.३ कीमीची मार्गिका असेल. त्यात चार स्थानकं असतील.

मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्णपणे मुंबई मीरा-भाईंदरला जोडण्याचं काम होतं आहे. ६६०७ कोटी रुपये या प्रकल्पासाठी लागणार आहेत. या प्रवासाकरिता किमान १ तास किंवा २ तास लागतात तो प्रवास आता ३० मिनिटांत होईल. ही मेट्रो ७ ला जोडली जाणार असून मेट्रो ३ लाही जोडली जाईल. कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी पुढच्या काळात मिळेल.

आता मुंबई मेट्रो देशात दुसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात या मेट्रोचे काम सुरू आहे पण ही त्या जिल्ह्यातील पहिली मेट्रो आहे. ही मेट्रो आणि कोस्टल रोड यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस वे रहदारीमुक्त पाहायला मिळेल. मला आनंद होतोय की आता आपण ऑपरेशन मेट्रोत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. दिल्लीनंतर आपल्या मेट्रोचा क्रमांक लागतो. दिल्लीपेक्षा मोठे नेटवर्क व्हावं हा आपला प्रयत्न आहे. मेट्रोमुळे १०० किमीचा टप्पा आपण पार केला आहे. पुढच्या दोन वर्षात यात भर पडेल.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ला गडबड झाली. मेट्रोच्या कामावर ब्रेक लागला. २०२२पर्यंत तो ब्रेक होता. पण आमचा पाय एक्सलेटरवर असतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झाले होते ते मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी केली जाईल. प्रदूषण कमी होईल. वेळेची बचत होईल. महायुती सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. रेल्वेत होणारी गर्दी कमी होईल.

हे ही वाचा:

ट्रम्प यांनी इराणला दिलेला अल्टिमेटम ४८ तासांवरून ४०८ तासांवर वाढला

न्यायव्यवस्थेला दाखवला ठेंगा; हिमाचल सरकारला १० लाखांचा दंड

इराण तणावाचा परिणाम: सोनं ₹१.५ लाखांवर, चांदीतही जोरदार उसळी

आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी अमरावती!

 

मेट्रो लाईन-९ (पहिला टप्पा) माहिती

पहिला टप्पा ४.७ किमी लांबीचा असून पूर्णपणे उंचावरील (elevated) मार्ग आहे. यात खालील चार स्थानकांचा समावेश आहे:

  • दहिसर पूर्व
  • पांडुरंगवाडी
  • मिरागाव
  • काशीगाव

हा नवीन मार्ग मीरा रोड परिसराला मेट्रो लाईन-७ शी दहिसर पूर्व येथे जोडतो. त्यामुळे प्रवासी थेट अंधेरी पूर्व आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (लाईन-7A द्वारे) सहज प्रवास करू शकतील.

पूर्ण मेट्रो लाईन-९ हा १०.५ किमीचा मार्ग असून मीरा-भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस गार्डनपर्यंत ८ स्थानकांसह विकसित केला जाणार आहे.

वेळापत्रक 

नवीन वेळापत्रकानुसार:

  • गर्दीच्या वेळेत (Peak hours) गाड्या दर ५.५ ते ६ मिनिटांनी
  • कमी गर्दीच्या वेळेत (Non-peak) दर ८ ते १० मिनिटांनी
  • सर्व मार्गांवर जास्त फेऱ्या चालवल्या जाणार

यामुळे प्रवाशांची वाढती संख्या सांभाळणे आणि गर्दी कमी करणे सोपे होईल.

प्रवाशांसाठी फायदे

१. सुलभ बदल (Seamless interchange):
दहिसर पूर्व येथे मेट्रो लाईन-७ आणि लाईन-२ए मध्ये स्टेशनच्या बाहेर न जाता बदल करता येईल.

२. वाहतूक कोंडी कमी:
२०-३०% रस्त्यावरील प्रवासी मेट्रोकडे वळतील, त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर १०-१५% गर्दी कमी होईल.

३. वेळेची बचत:
काशीगाव आणि आसपासच्या भागातील लोकांना अंधेरी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल.

४. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी:
बस, रिक्षा आणि इतर मेट्रो लाईन्सशी सहज जोडणी मिळेल, त्यामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल.

पर्यावरणपूरक आणि प्रवासी-अनुकूल सुविधा

ही मेट्रो लाईन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित आहे:

  • इलेक्ट्रिक ऑपरेशन
  • ऊर्जा बचत करणारी डिझाइन
  • कमी कार्बन उत्सर्जन
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग

स्थानकांवर लिफ्ट, एस्कलेटर, CCTV, आधुनिक साइनबोर्ड, टॅक्टाइल पाथ आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा