नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणातून आमूलाग्र बदलणाऱ्या अमेरिकेचा हुंकार, पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवणार

शिक्षण धोरण बदलणार, अनधिकृत स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता, वाहन उद्योगात क्रांती...

नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणातून आमूलाग्र बदलणाऱ्या अमेरिकेचा हुंकार, पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवणार

अमेरिकेचा सुवर्णकाळ आजपासून सुरू झाला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नव्या कारकीर्दीचे वर्णन केले. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे ४७वे राष्ट्रप्रमुख म्हणून ७८ वर्षीय ट्रम्प यांनी शपथ घेतली आणि आजच्या दिवसापासून अमेरिका प्रगतीच्या मार्गावर घोडदौड करेल आणि अमेरिकेचा आदरसन्मान अधिक वृद्धिंगत होईल, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या या भाषणात अमेरिकेच्या आगामी वाटचालीचा समग्र आलेख होता. अत्यंत कठोर असे काही निर्णय आपल्या सरकारच्या काळात घेतले जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आणि अखंड टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी ट्रम्प यांचे कौतुक केले.

आपण अमेरिकेला पहिल्या क्रमांकावर नेणार आहोत, असा आत्मविश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. अमेरिका यापूर्वी कधीही नव्हती अशी महान, अधिक बलवान आणि एकमेवाद्वितिय असेल अशी गर्जनाही ट्रम्प यांनी केली.

हे ही वाचा:

मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’

परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न

गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा

ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सांगितले की, अमेरिकन जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात आम्हाला जनतेने भरघोस बहुमत दिले आहे. जनतेला आम्ही तो विश्वास परत देऊ, संपत्ती, लोकशाही आणि स्वातंत्र्यही अमेरिकन जनतेला परत दिले जाईल. या क्षणापासून अमेरिकेची घसरण आम्ही संपुष्टात आणत आहोत.

ट्रम्प यांनी दोन बायबल्सद्वारे शपथग्रहण केली. एक बायबल त्यांना त्यांच्या आईने देऊ केले होते तर दुसरे हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी शपथग्रहण करताना वापरले होते.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले. एक्सवरून त्यांनी हे अभिनंदन केले. ते म्हणतात,  अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल परममित्र डोनाल्ड ट्रम्प आपले खूप अभिनंदन. दोन्ही देशांच्या भल्यासाठी आपण एकत्र काम करू. त्यातून जगाचे हित साध्य होईल हा प्रयत्न करू. पुन्हा एकदा या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

ट्रम्प यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 

Exit mobile version