‘पुष्पा’ या चित्रपटाचा दुसरा भाग चांगलाच लोकप्रिय ठरला. लाल चंदनाची तस्करी हा या पुष्पाचा धंदा असल्याचे आणि त्यातून अफाट माया त्याने जमवल्याचे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. अशाच लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई सेंट्रल येथे रेल्वे पोलिसांनी अटक केली आणि या पुष्पा चित्रपटाची आवर्जून आठवण झाली.
पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाकडून सुमारे १२ तास चाललेल्या सखोल तपासणीदरम्यान, ट्रेन क्रमांक १२९५६ (जयपूर – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस) च्या सामानाच्या बोगीतून लाल चंदनाचे १५ लाकडी ओंडके जप्त करण्यात आले. या चार संशयास्पद पॅकेजेसचे एकूण वजन ९२.९ किलो होते. कायदेशीर पार्सल बुकिंगच्या नावाखाली हे साहित्य तस्करीसाठी पाठवण्यात आल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणी मालक हारून अब्दुल लतीफ मांडवीवाला यांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वस्तू आणि आरोपींला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वन विभागाकडे सोपवण्यात आले आहे. ही मोहीम दक्षतेच्या प्रयत्नांची प्रभावीता दर्शवते आणि पश्चिम रेल्वेच्या परिसराचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होणार नाही याची खात्री करते.
हे ही वाचा :
परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न
महाराष्ट्रात चमत्कार, भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार!
ब्रिटीश लेबर खासदार हिंदूंऐवजी जमात-ए-इस्लामीला भेटले
हॉटेल ट्रायडंटच्या खोलीत आढळला महिलेचा मृतदेह