29.8 C
Mumbai
Saturday, May 16, 2026
घरदेश दुनियाइस्रायली हल्ल्यात हमासच्या सशस्त्र गटाचा कमांडर ठार

इस्रायली हल्ल्यात हमासच्या सशस्त्र गटाचा कमांडर ठार

इस्रायली संरक्षण दलाने दिली माहिती

Google News Follow

Related

इस्रायली संरक्षण दलाने शनिवार, १६ मे रोजी गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या सशस्त्र गटाचा कमांडर इझेदीन अल-हद्दाद ठार झाल्याची पुष्टी केली. “आयडीएफ आणि आयएसए जाहीर करतात की, काल गाझा शहराच्या परिसरात केलेल्या एका अचूक हल्ल्यात दहशतवादी इझेदीन अल-हद्दाद ठार झाला,” असे इस्रायली लष्कराने स्वतःचा आणि इस्रायलची देशांतर्गत सुरक्षा संस्था शिन बेटचा संदर्भ देत म्हटले. लष्कराने पुढे सांगितले की, हद्दाद हा हमासच्या लष्करी शाखेतील शेवटच्या वरिष्ठ कमांडरांपैकी एक होता, जो ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होता.

हमासच्या दोन अधिकाऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला की, शुक्रवारी गाझा शहरात एका निवासी अपार्टमेंट आणि एका नागरिकाच्या वाहनावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात हद्दाद ठार झाला. इस्रायली लष्कराने असा दावा केला आहे की, इस्रायल- हमास युद्धादरम्यान हद्दाद अनेक इस्रायली नागरिकांना हमासच्या कैदेत ठेवण्यात सामील होता. “हद्दादने हमासच्या ओलीस ठेवण्याच्या व्यवस्थेचे व्यवस्थापन केले आणि स्वतःला ठार होण्यापासून वाचवण्यासाठी ओलिसांना आपल्याभोवती वेढले होते,” असे इस्रायली संरक्षण दलाने पुढे म्हटले.

गाझामधील लढाई थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या, अमेरिकेच्या पाठिंब्याने ऑक्टोबरमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर इस्रायलने ठार केलेला हमासचा हद्दाद हा सर्वात वरिष्ठ सदस्य होता, असे रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे. वृत्तानुसार, शनिवारी मध्य गाझामधील अल अक्सा शहीद मशिदीत हद्दाद, त्याची पत्नी आणि १९ वर्षीय मुलीवर संयुक्त अंत्यविधी पार पडला.

इस्रायलने शुक्रवारी गाझामध्ये केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये तीन महिला आणि एका मुलासह सात पॅलेस्टिनी ठार झाले हमासच्या नेत्याला लक्ष्य करण्यासाठी लष्कराच्या हवाई हल्ल्याची घोषणा यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका संयुक्त निवेदनात केली होती. नेतान्याहू आणि काट्झ यांनी हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यांचा सूत्रधार म्हणून हद्दास याचा उल्लेख केला.

हे ही वाचा:

“भारतात आकांक्षा अमर्याद असून प्रयत्नही अमर्याद होत आहेत!”

पश्चिम बंगालमध्ये मागील १५ वर्षांतील मागासवर्गीय प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

तिलक वर्मावरच्या टिप्पणीमुळे अर्शदीप वादात!

तिलकचा तडाखा, शार्दुलचा कहर!

हद्दाद याचा जन्म १९७० मध्ये झाला आणि मे २०२५ मध्ये इस्रायलने मोहम्मद सिनवार याची हत्या केल्यानंतर तो गाझामधील हमासचा लष्करप्रमुख बनला. इस्रायलने त्यांना ठार मारण्याचे अनेक प्रयत्न करूनही तो बचावला होता. नेतान्याहू आणि काट्झ यांनी संयुक्त निवेदनात म्हटले होते की, हद्दास हा हजारो इस्रायली नागरिक (आणि) सैनिकांच्या हत्या, अपहरण आणि त्यांना झालेल्या हानीसाठी जबाबदार होता. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, तो हमासच्या सर्वाधिक काळ सेवा केलेल्या कमांडरांपैकी एक होता आणि १९८० च्या दशकात गटाच्या सुरुवातीच्या स्थापनेपासून बढती मिळवत त्याने अनेक वरिष्ठ पदे भूषवली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा